Raj Thackery and Uddhav Thackeray Saam tv
मुंबई/पुणे

Raj Thackery and Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र? दोघांमध्ये काय चर्चा झाली? पाहा स्पेशल रिपोर्ट

Raj Thackery and Uddhav Thackeray came together : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र आले आहे. एकत्र येण्यासाठी निमित्त भाच्याचं लग्न ठरलं. त्यांच्या चंदू मामा यांच्या प्रयत्नामुळे दोन्ही बंधू एकत्र आले.

Snehil Shivaji

मुंबई : आज राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाचं लग्न मुंबईत पार पडलं. या लग्नाच्या निमित्तानं कुटुंबात पडलेली दुही संपली आणि ठाकरे कुटुंब एकत्र आल्याच्या चर्चा सुरु झाल्या. नेमकं या लग्नानं बाळासाहेबांचे कुटुंब कसं एकत्र आणलं पाहुया.

हे चित्र ठाकरे प्रेमींना मोठा दिलासा देणारंय. राज ठाकरेंची बहिण जयवंती ठाकरेंच्या मुलाचं लग्नात गेल्या अनेक वर्षापासून दुरावलेलं सगळ ठाकरे कुटुंब एकत्र दिसलं. आणि ठाकरे कुटुंबावर प्रेम करणाऱ्या मराठी मनाला हायसं वाटलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या भावांचा वाद अख्या महाराष्ट्राला माहितीये. परंतू या लग्नात केवळ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच एकत्र आले नव्हते तर दोघं भाऊ मस्त गप्पा मारत हास्यविनोदही करतांना दिसले. यावेळी या भावांचा वावर पाहुन पुन्हा दोघांनी एकत्र यावं अशी अनेकांची मनातील इच्छा पुन्हा एकदा दाटून आली असेल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

या लग्नात ठाकरे कुटुंबातील कोण कोणते सदस्य सहभागी झाले ज्यांची चर्चा झाली ते पाहुयात. राज ठाकरेंची बहिण जयवंती ठाकरेंच्या मुलाच्या लग्नात उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील हिरहिरीनं सहभागी झाल्या. यावेळेस राज ठाकरे आणि रश्मी ठाकरे एकमेकांशी सवांद साधताना दिसून आले. या लग्नात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते निहार ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या या एकत्र फोटोनं. कारण अँडव्होकेट निहार ठाकरे उद्धव ठाकरेंचे जेष्ठ दिवंगत बंधू बिंदू माधव ठाकरेंचा मुलगा आहे. मात्र निहार यांनी शिवसेनेच्या कायदेशीर लढाईत कोर्टात शिंदे गटाची मांडलीय. त्यामुळे हे दृश्य जरा भुवया उंचावणारं होतं.

यात आणखी एक भर म्हणजे उद्धव ठाकरेंवर टीका करत एकनाथ शिंदेंसोबत मंचावर बसणाऱ्या स्मिता ठाकरेही उद्धव ठाकरेंसोबत दिसल्या....त्यामुळे लग्नाचा हा फोटो सगळं वितुष्ट संपल्याची ग्वाही तर देत नाहीय ना?....बाकी काही असो बाळासाहेबांचं एकमेकांपासून दुरावलेलं ठाकरे कुटुंब या लग्नाच्या निमित्ताने का होईना पण एकत्र आलं....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT