
मुंबई : कल्याणमधील परप्रांतीय व्यक्तीने मराठी कुटुंबाला केलेल्या मारहाणीचं राज्यभर पडसाद उमटत आहेत. या व्यक्तीने केलेल्या मारहाणीचा मुद्दा सभागृहातही गाजला. परप्रांतीय शुक्लाविरोधात मुख्यमंत्र्यांनी कारवाईची घोषणा केली. कल्याणमधील शुक्लाला नोकरीवरून निलंबित करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या प्रकरणात आता मनसेनेही उडी घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोस्ट करत थेट परप्रांतीय शुक्लाविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
कल्याणमध्ये एका मुजोर अमराठी माणसाने मराठी माणसाला,मराठीपणावरून अर्वाच्य शिव्या दिल्या. जबर मारहाण केली. काही दिवसांपूर्वी गिरगावमध्ये एका अमराठी माणसाने मुजोरी दाखवली. त्याला मनसैनिकांनी जागीच प्रसाद दिला. कल्याणमधीही मनसैनिक प्रसाद द्यायला गेले होते. कल्याणमध्येही अनेक महाराष्ट्रद्वेषी शुक्ला गुप्तपणे राहताहेत.
प्रत्येकवेळेला महाराष्ट्रद्वेषी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात. अजून तुम्हाला किती वाकवता येईल हे बघत असतात. महाराष्ट्राबाहेरून इथे आलेले सगळेच महाराष्ट्रद्वेषी आलेले नाहीत. येथील मातीत मिसळून राहणारेही अनेक अमराठी माणसं आहेतच. काही महाराष्ट्रद्वेषींची नवीन पिलावळ इथे गेले काही वर्ष वळवळायाला लागली आहे. ज्यांचा डोळा येथील जमिनीवर आहे. या लोकांना वेळीच ठेचलं पाहिजे.
मराठी माणसांनो आतारी जागे व्हा, अन्यथा हे तुमच्या पायाखालची जमीन कधी खेचतील. तुम्ही नेस्तनाबूत व्हाल हे समजणारही नाही. कल्याणमधील आमदारही मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा म्हणून पाठपुरावाही करत नाहीत. हे का घडतं? सर्व आमदार खासदारांनी मराठी जनतेला पुरतं ओळखलं आहे. मतदारांना थोडं आमिषं दाखवा की हे करतात मतदान आम्हाला! मी गेली अनेक वर्ष जे नेहमी तुम्हाला सांगतोय की या सर्वांनी तुम्हाला गृहीत धरलं आहे. तुम्हाला सर्वांनी गृहीत धरलं आहे. अशा घटना घडल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दरवाजे ठोठवावेसे वाटतात. कारण तेव्हा खात्री असते की, इतर पक्ष तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत. मतदानाच्या वेळेला मात्र हाच मराठी माणूस इतर पक्षांच्या दरवाजावर जाऊन टकटक करतो.
'लाडकी बहीण'च्या नावाखाली मतं मागणाऱ्यांना माझा प्रश्न आहे की, कल्याणमधील ज्या कुटुंबाला मारहाण झाली त्या व्यक्तीची बायको, आई, बहीण ही तुमची लाडकी बहीण नाही का ? मंत्रिपदं महाराष्ट्राची उपभोगणार. परंतु त्याच भूमिपुत्राला तुमचा आधार नसणार. तुम्हाला तुमचा मराठी बांधव सोडून हे असले मुजोर जास्त जवळचे वाटताहेत का? लाचारी कशातून येते ते मला माहीत नाही आणि तुमची लाचारी तुम्हाला लखलाभ.
आज आपण हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजे, हे ठीक आहे. हिंदू म्हणून एकत्र येताना प्रत्येक राज्यात तेथील भाषा, स्थानिक माणसं, संस्कृती यांना चिरडण्याचा प्रयत्न होता कामा नये. आम्ही हिंदूत्व पुजतो. परंतु हिंदू म्हणून एकत्र आणायच्या नावाखाली मराठी माणसाच्या किंवा इतर राज्यातील कुठच्याही स्थानिक माणसाच्या गळ्याला नख लगणार नाही. हे देखील पाहिले पाहिजे. माझा पोलिसांवर विश्वास असून त्यांनी विश्वासाला सार्थ ठरावं. राज्य सरकारने पण हे असले प्रकार परत होणार नाहीत, यासाठी ठोस कारवाई करावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.