येत्या विकेंडला मेघगर्जनेसह पाऊस; पुण्यासह 11 जिल्ह्यांना IMDचा इशारा Saam Tv
मुंबई/पुणे

येत्या विकेंडला मेघगर्जनेसह पाऊस; पुण्यासह 11 जिल्ह्यांना IMDचा इशारा

गेल्या दोन तीन दिवसांत पुण्याच तापमान मध्येही घट झाली असून राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद पुण्यात झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: उत्तर पूर्व परिसरात हवेचा दाब Air Pressure वाढलं आहे. त्यामुळे राज्यात किमान तापमानात बरीच घट झालेली दिसून येत आहे. तर गेल्या दोन तीन दिवसांत पुण्याच तापमान मध्येही घट झाली असून राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद पुण्यात झाली आहे. तर आज पहाटे पुणे जिल्ह्यातील हवेली Temperature In Haveli Pune याठिकाणी सर्वात कमी म्हणजेच 10.3 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे पुण्यात पहाटे वातावरणात प्रचंड गारवा वाढलेला आहे.

दुसरीकडे, सध्या तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर सध्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. पुढील एक-दोन दिवसामध्ये हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे त्यामुळे 11 नोव्हेंबरपर्यंत तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. संबंधित परिसरात हवामान खात्याने IMD Red Alert रेड अलर्ट जारी केला आहे. भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या हवामानाचा काही परिणाम महाराष्ट्रावर देखील होणार आहे.

त्यामुळे येत्या विकेंडला महाराष्ट्रातील कोकण, घाटचा परिसर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने शनिवारी (ता. १३ नोव्हेंबर) आणि रविवारी (ता. १४ नोव्हेंबर) पुण्यासह एकूण ११ जिल्ह्यांना येलो अलर्ट Yellow Alert to Pune जारी केला आहे. त्यामुळे शनिवारी राज्यात पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, बीड आणि लातूर या जिल्ह्यांना IMD कडून येलो अलर्ट जारी केला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karisma Kapoor: दिवाळी स्पेशल करिश्मा कपूरच्या बोल्ड साडी लूक पाहून चाहाते घायाळ, PHOTO व्हायरल

Dhanashree Kadgaonkar Photos: मन तळ्यात मळ्यात.. जाईच्या कळ्यात, टिव्हीच्या वहिनीसाहेबाचं सौंदर्य खुललं

ट्रेकिंग करताना पक्षाघात, पण ८४ वर्षीय करवंदे काका हरले नाहीत; १७०६ वेळा सर केला सिंहगड किल्ला!

Snake Hidden Inside Scooter: अरे बापरे बाप! स्कुटीला स्टार्टर मारणार तोच फुसफुसला, हेडलाइटमध्ये लपला होता विषारी साप, VIDEO

Maharashtra Live News Update : उदयनराजे-जयकुमार गोरे यांच्यात मिश्कील दिलजमाई

SCROLL FOR NEXT