Rain Updates Heavy Rain Started in Pune City Many Area Traffic Updates Saam TV
मुंबई/पुणे

Pune Rain Updates: अखेर प्रतीक्षा संपली! पुण्यात भल्यापहाटे मुसळधार पावसाला सुरुवात; नागरिकांची उडाली तारांबळ

Pune Rain News: तब्बल दोन आठवड्याच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर पुणे शहरात आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे.

Satish Daud

सचिन जाधव, साम टीव्ही

Pune Rain News Today: तब्बल दोन आठवड्याच्या प्रतिक्षेनंतर पुणे शहरात आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. शहरातील अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. मागील काही दिवसांपासून पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा होती. अखेर पुणेकरांची पावसाची प्रतीक्षा संपली आहे. (Latest Marathi News)

पुण्यातील (Pune News) काही परिसरात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. काही परिसरात मुसळधार तर पावसाच्या हलक्या सरी सुरु आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात पावसाने पाठ फिरवली होती. उन्हाच्या झळा बसत असल्याने पुणेकरांना उकाडा जाणवत होता.

या उकाड्यामुळे पुणेकर हैराण झाले होते. त्यामुळे पाऊस नेमका कधी कोसळणार? याची वाट शहरासह ग्रामीण भागातील शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान, आज म्हणजेच शनिवारी पहाटेच्या सुमारास पुण्यात ढग दाटून आले. काहीच वेळात पावसाला सुरूवात झाली.

शहरातील वारजे, शिवणे कात्रज, कोंढवा, स्वारगेट, तसेच सिंहगड रोड परिसरात पावसाच्या जोरदार सरी (Rain News) कोसळत आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास अचानक पावसाला सुरूवात झाल्याने पुणेकरांची पुरती तारांबळ उडाली. सकाळी कामावर निघालेले अनेकजण पावसामुळे अडकून पडले होते.

पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट

दरम्यान, यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने तसेच पावसाने दडी मारल्याने शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे अद्याप पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत पुणे शहरातील पाणी कपातीचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी साडे पाच वाजता कालवा समितीची बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थितीत राहणार की नाही, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या बैठकीत काय निर्णय होतो? याकडेच पुणेकरांचं लक्ष लागून आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bed Sheet Fitting Tips: बेडवर हॉटेलसारखी परफेक्ट चादर कशी घालावी? अंथरूणाची चादर न चुरगळता नीट टाकण्याच्या सोप्या टिप्स

Mumbai Railway Accident: 15 ते 20 फूट फरफटत नेलं; एसी लोकलच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, एक ते दीड तास रेल्वे उशीराने

भीती वाटू लागली तर पोटात गोळा अन् छातीत धडधड का होते?

Dizziness Causes: अचानक चक्कर का येते? दुर्लक्ष करू नका; लगेच करा 'या' महत्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT