Dizziness Causes: अचानक चक्कर का येते? दुर्लक्ष करू नका; लगेच करा 'या' महत्वाच्या गोष्टी

Shruti Vilas Kadam

अचानक चक्कर आल्यास सर्वप्रथम बसा किंवा झोपा

अचानक चक्कर आल्यास लगेच बसावे किंवा सुरक्षित ठिकाणी झोपावे. चक्कर कमी होईपर्यंत उठण्याची घाई करू नका. यामुळे तोल जाऊन पडण्याचा धोका कमी होतो.

Dizziness Causes | Saam Tv

शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका

शरीरात पाण्याची कमतरता झाल्यामुळे चक्कर येऊ शकते. विशेषतः उन्हात जास्त वेळ राहिल्यानंतर किंवा घाम आल्यामुळे शरीरातील पाणी कमी झाल्यास त्रास जाणवू शकतो.

Dizziness | pinterest

रक्तदाब कमी झाल्यामुळे

चक्कर आल्यावर अचानक बसलेल्या जागेवरुन उभे राहिल्यास रक्तदाब कमी होऊ शकतो. त्यामुळे डोळ्यांसमोर अंधारी येणे किंवा आणखी चक्कर येण्याचा त्रास होऊ शकतो.

dizziness | saam tv

रक्तातील साखर कमी झाल्यामुळे

रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यास चक्कर येणे, घाम फुटणे, अशक्तपणा आणि थरथर जाणवू शकते.

Dizziness | pinterest

कानाच्या समस्यांमुळे

कानाच्या आतील भागात शरीराचा तोल सांभाळणारी यंत्रणा असते. या भागाला त्रास झाल्यामुळे आजूबाजूचे जग फिरत असल्यासारखे वाटू शकते. चक्कर वारंवार येत असल्यास किंवा कानात आवाज येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

dizziness BP symptom

वाहन चालवू नका

चक्कर येत असताना वाहन चालवणे, जिने चढणे किंवा उंच ठिकाणी काम करणे टाळा. अचानक तोल गेल्यास अपघात होऊ शकतो.

Dizziness | Yandex

वैद्यकीय मदत घ्या

चक्कर येण्यासोबत छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, डोकेदुखी, बोलण्यात अडचण, एका बाजूला अशक्तपणा किंवा बेशुद्ध पडणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या.

Dizziness Causes | Yandex

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Health Tips | Saam Tv

Private Part Hair Removal: महिलांनो, प्रायव्हेट पार्ट्सचे केस काढताना करू नका 'या' चुका; लक्षात ठेवा ७ गोष्टी

Private Part Hair Removal | Saam Tv
येथे क्लिक करा