Private Part Hair Removal: महिलांनो, प्रायव्हेट पार्ट्सचे केस काढताना करू नका 'या' चुका; लक्षात ठेवा ७ गोष्टी

Shruti Vilas Kadam

केस काढणे आवश्यकच आहे असे नाही

प्रायव्हेट पार्ट्सवरील केस हे त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करतात. त्यामुळे ते काढणे वैयक्तिक पसंतीवर अवलंबून आहे. केस काढले नाहीत तरी स्वच्छतेची योग्य काळजी घेता येते.

Private Part Hair Removal | Saam Tv

केस काढण्यापूर्वी स्वच्छता महत्त्वाची

केस काढण्यापूर्वी बाहेरील जननेंद्रियाचा भाग कोमट पाण्याने स्वच्छ करा. यामुळे त्वचेवरील घाम आणि धूळ दूर होण्यास मदत होते.

Private Part Hair Removal | Pintrest

स्वच्छ आणि धारदार रेझर वापरा

शेव्हिंगसाठी स्वतःचे स्वच्छ रेझर वापरा. दुसऱ्याचे रेझर वापरू नका. गंजलेले किंवा बोथट ब्लेड वापरल्याने त्वचेला जखम होण्याचा धोका वाढतो.

Private Part Hair Removal | Pintrest

केसांच्या वाढीच्या दिशेने शेव्हिंग करा

रेझर वापरताना केस ज्या दिशेने वाढतात, त्याच दिशेने हळूवार शेव्हिंग करा. वारंवार एकाच जागेवर रेझर फिरवणे टाळा. यामुळे त्वचेची जळजळ, कट्स आणि इनग्रोन हेअर्सचा धोका होऊ शकतो.

Private Part Hair Removal | Pintrest

शेव्हिंग जेलचा वापर करा

कोरड्या त्वचेवर शेव्हिंग करू नका. संवेदनशील त्वचेसाठी योग्य, सुगंध नसलेले शेव्हिंग जेल किंवा क्रीम वापरा. यामुळे रेझर आणि त्वचेमधील घर्षण कमी होण्यास मदत होते.

Private Part Hair Removal | Pintrest

हेअर रिमूव्हल क्रीम वापरताना सावध राहा

सामान्य हेअर रिमूव्हल क्रीम प्रायव्हेट पार्ट्सच्या संवेदनशील त्वचेला त्रास देऊ शकतात. त्यामुळे जळजळ किंवा खाज जाणवल्यास उत्पादन त्वरित धुऊन टाका.

Private Part Hair Removal | Pintrest

केस काढल्यानंतर त्वचेची काळजी घ्या

केस काढल्यानंतर त्वचा स्वच्छ पाण्याने धुवा आणि मऊ टॉवेलने साफ करा. घट्ट कपडे आणि सुगंधित प्रोडक्ट काही काळ लावू नका. त्वचेवर सूज, पू, वेदना किंवा जळजळ होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

Private Part Hair Removal | Pintrest

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Private Part Hair Removal | Canva

Sai Tamhankar: सई ताम्हणकरचा मॉडर्न आणि क्लासी अंदाज; ब्लू शर्ट-स्कर्ट कॉम्बिनेशनने वेधलं लक्ष

Sai Tamhankar | Saam Tv
येथे क्लिक करा