Manasvi Choudhary
घर कितीही सजवलेले असले तरी जर बेडरूममधील बेडवर चादर नीट नसेल तर संपूर्ण घराचा लूक बिघडतो.
घरात नवीन पाहुणे आल्यावर सर्वात पहिले लक्ष जाते ते म्हणजे बेडवरच. यासाठूी तुम्हालाही हॉटेलसारखा बेड नेहमी नीटनेटका ठेवणे गरजेचे आहे.
चादर टाकण्यापूर्वी गादीवर साचलेली धूळ झाडून घ्या. गादी व्यवस्थित सरळ आणि नीटनेटकी असल्याची तपासा, जेणेकरून चादर टाकताना ती सरकणार नाही.
चादर टाकताना ती सर्व बाजूंनी गादीच्या खाली व्यवस्थित सरकवून घ्या.
सकाळी उठल्याबरोबर बेडवरची चादर झाडून पुन्हा नीट पसरवून ठेवा. ही छोटीशी सवय घराला कायम नीटनेटके ठेवण्यास मदत करते.
झोपण्याच्या उशा नेहमी बेडच्या वरच्या बाजूला व्यवस्थित सरळ करून ठेवा. त्यावर सुंदर कुशन किंवा शोभेच्या उशा ठेवा.
बेडवर वापरले जाणारे पांघरूण व्यवस्थित घडी करून पसरवून ठेवा. तसेच आठवड्यातून किमान एकदा आंथरूण आणि चादर स्वच्छ पाण्याने धुवून बदलत राहा.