Manasvi Choudhary
चहा अनेकांच्या दैंनदिन जीवनाचा भाग बनला आहे. आपल्यापैकी अनेेकजण सकाळी उठल्याबरोबर चहा पितात.
परंतु, चहामध्ये असणारे कॅफिन , टॅनिन आणि साखरेचे प्रमाण नकळत शरीराला हानी पोहोचवत असते. जर तुम्ही सलग १ महिना चहा पिणे पूर्णपणे बंद केले, तर तुमच्या शरीरात अनेक आश्चर्यकारक बदल होतात.
रिकाम्या पोटी किंवा दिवसातून अनेकदा चहा प्यायल्याने पोटात पित्त वाढते. १ महिना चहा सोडल्यास पोटातील ॲसिडची पातळी संतुलित होते, ज्यामुळे अपचन, गॅस आणि छातीत होणारी जळजळ पूर्णपणे थांबते.
चहामधील कॅफिन मज्जासंस्थेला उत्तेजित करते, ज्यामुळे रात्री शांत झोप येण्यात अडथळा निर्माण होतो. चहा बंद केल्यावर मेंदू शांत होतो आणि गाढ तसेच शांत झोप लागण्यास मदत होते.
१ महिना चहा आणि साखर सोडल्याने पोटाची चरबी कमी होण्यास आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
चहामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. चहा बंद केल्यावर शरीर डिटॉक्स होते, ज्यामुळे त्वचेवरील पुळ्या कमी होऊन नैसर्गिक चमक येते.
पचनक्रिया सुरळीत झाल्यामुळे शरीराची अन्नद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते.