Manasvi Choudhary
केशर आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या मसाल्यांपैकी एक आहे.
अनेक पदार्थ्यांमध्ये केशरचा वापर केला जातो. परंतु केशर फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानला जातो.
केशरामध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स आणि दाह-विरोधी गुणधर्म असतात. आंघोळीच्या कोमट पाण्यात केशर मिक्स केल्याने शरीराला फायदा होतो.
केशरमध्ये असणारे गुणधर्म त्वचेतील मेलानिनची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात. यामुळे त्वचेचा निस्तेजपणा दूर होऊन चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.
उन्हामुळे किंवा प्रदूषणामुळे त्वचेवर पडलेले काळे डाग, सनबर्न आणि टॅनिंग दूर करण्यासाठी केशरयुक्त पाणी अत्यंत गुणकारी ठरते.
केशरामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. यामुळे अंगावर येणाऱ्या पुळ्या, खाज किंवा त्वचेची जळजळ शांत होण्यास मदत होते.
कोमट पाण्यात केशर मिसळून स्नान केल्याने त्वचेचे रोमछिद्र (Pores) स्वच्छ होतात आणि त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकून राहतो, ज्यामुळे त्वचा रखरखीत न होता मऊ आणि मुलायम बनते.