Tea Benefits For Heart Health: रोज 1 कप चहामुळे कमी होतो हृदयविकाराचा धोका? नवीन अभ्यासात समोर आली आश्चर्यकारक माहिती

Manasvi Choudhary

चहा पिण्याची सवय

सकाळी चहा पिणे हा अनेकांच्या रोजच्या दिनक्रमाचा भाग आहे. चहाचा एक घोट घेतल्याशिवाय मूड फ्रेश होत नाही.

tea | pinterest

हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचा धोका कमी

वैद्यकीय संशोधनानुसार, नियमित आणि योग्य प्रमाणात चहा प्यायल्याने हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचा धोका कमी होऊ शकतो.

heart | pinterest

हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत

यासाठी चहामध्ये असणारे नैसर्गिक घटक हृदयाला निरोगी ठेवण्यास कशी मदत करतात, ते जाणून घेऊया.

Tea Benefits For Heart Health | PINTREST

चहामधील अँटीऑक्सिडंट्सची जादू

चहाच्या पानांमध्ये पॉलिफेनॉल नावाचे नैसर्गिक वनस्पती संयुगे असतात, ज्यात फ्लेव्होनॉइड्सचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो.

Tea

रक्ताभिसरण सुरळीत होते

या घटकांमध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आणि दाह-विरोधी गुणधर्म असतात.घटक रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) चे ऑक्सिडेशन रोखतात आणि रक्तवाहिन्यांचे लवचिकता जपून रक्ताभिसरण सुरळीत ठेवतात.

blood circulation | pinterest

ब्लॅक टी की ग्रीन टी: कोणता चहा प्यावा?

ग्रीन टीमध्ये 'कॅटेचिन' मुबलक प्रमाणात असते. हे चयापचय वाढवते, वजन नियंत्रित ठेवते आणि रक्तवाहिन्यांमधील जळजळ कमी करून हृदयाचे संरक्षण करते.

ब्लॅक टीमध्ये 'थिआफ्लेव्हिन्स' असतात, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राखण्यास मदत करतात.

Green TEA

अधिक चहा प्यायल्याने जास्त फायदा होतो का?

प्रमाणापेक्षा जास्त चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. चहामध्ये कॅफिन आणि टॅनिन असते. दिवसभरात ४-५ कपपेक्षा जास्त चहा प्यायल्याने निद्रानाश, ॲसिडिटी, चिडचिड आणि छातीत जळजळ यांसारखे त्रास होऊ शकतात.

Tea

गरम चहा पिणे का टाळावे?

उकळता किंवा अत्यंत कडक गरम चहा पिण्याची सवय अत्यंत धोकादायक आहे. खूप गरम पेये प्यायल्याने अन्ननलिका आणि घशाच्या नाजूक पेशींना दुखापत होते, ज्यामुळे अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. .

Tea

NEXT: Banana Peels Benefits For Skin : त्वचेवर केळीची साल लावा, डार्क सर्कल होतील गायब आणि चेहरा दिसेल काचेसारखा

Banana Peels Benefits For Skin
येथे क्लिक करा..