Manasvi Choudhary
केळी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक मानली जातात. आपण नियमितपणे केळी खातो आणि केळीची साल फेकून देतो.
परंतु तुम्हाला माहीत आहे का की, केळीची साल त्वचेसाठी अत्यंत प्रभावी मानली जाते.
केळीच्या सालीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी-६, व्हिटॅमिन सी आणि भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेचा रंग उजळवण्यास आणि अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात.
केळीच्या सालीचा आतील भाग मऊ चमच्याने खरवडून त्यात थोडेसे ॲलोवेरा जेल किंवा मध मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास डार्क सर्कल्स कमी होतात.
केळीची साल चेहऱ्यावर हलक्या हाताने चोळून मसाज करा आणि त्यानंतर १५ मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुतल्यास त्वचेतील मृत पेशी निघून जातात
केळीच्या सालीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. पिंपल्स किंवा त्यांचे डाग असलेल्या जागेवर केळीची साल घासल्यास इन्फेक्शन कमी होते आणि डाग हलके होतात.
केळीच्या सालीतील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन 'सी' त्वचेसाठी फायदेशीर आहेत. त्वचेवरील सुरकुत्या कमी करतात.