Home Remedies To Repel Spiders : महागड्या स्प्रेची गरज नाही; घरातील 'या' साध्या गोष्टींनी पळवून लावा कोळी

Manasvi Choudhary

कोळ्यांचे जाळे

घराची साफसफाई करताना भिंतींच्या कोपऱ्यांमध्ये, सिलिंगवर आणि खिडक्यांच्या बाजूला कोळ्यांचे जाळे जमा झालेले दिसतात.

Home Remedies To Repel Spiders | Google

नैसर्गिक आणि घरगुती उपाय

परंतु कितीही साफसफाई केली तरी कोळी पुन्हा तिथेच जाळे विणतात. कोळ्यांना मारून टाकण्याऐवजी काही नैसर्गिक आणि घरगुती उपायांच्या मदतीने त्यांना कायमचे दूर ठेवता येऊ शकते.

Home Remedies To Repel Spiders | Google

कोळी पळवण्याचे ५ सोपे उपाय

बाजारात मिळणाऱ्या रासायनिक स्प्रेऐवजी तुम्ही घरगुती सोपे उपाय करा. कोळी पळवण्याचे ५ सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय वाचा.

Home Remedies To Repel Spiders | Google

व्हिनेगर स्प्रे

व्हिनेगरचा वास कोळ्यांना अजिबात सहन होत नाही. एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी आणि पांढरे व्हिनेगर समान प्रमाणात मिसळून हा स्प्रे भिंतींच्या कोपऱ्यांवर आणि कोळ्यांच्या जागी फवारावा.

Vinegar Spray | yandex

कापराच्या गोळ्या किंवा वड्या

कापराचा उग्र वास जसा घरात प्रसन्नता आणतो, तसाच तो किटक आणि कोळ्यांना दूर ठेवण्यास मदत करतो. घराच्या कोपऱ्यांमध्ये कापराच्या वड्या किंवा गोळ्या ठेवल्याने कोळी त्या भागात येत नाहीत.

Camphor | pinterest

लिंबू किंवा संत्र्याच्या सालीचा रस

लिंबू किंवा संत्र्याच्या सालीमध्ये असणारे सायट्रिक ॲसिड कोळ्यांना दूर ठेवते. सालीचा रस किंवा त्याचे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून कोळ्यांच्या आश्रयस्थानांवर फवारावे.

Citrus Peel Juice | Yandex

पुदिन्याचे तेल

पेपरमिंट ऑइल हा कोळी पळवण्यासाठी एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. पाण्यात पुदिन्याच्या तेलाचे काही थेंब टाऊन स्प्रे तयार करा आणि भितींवर किंवा कोपऱ्यांमध्ये मारा.

Peppermint Oil | Google

नियमित स्वच्छता

कोळ्यांना दूर ठेवण्यासाठी घराची नियमित साफसफाई करणे आणि कोपऱ्यांमधील जाळे वेळोवेळी झटकून काढणे सर्वात प्रभावी ठरते.

NEXT: घरातल्या 'या' २ गोष्टी एकत्र करा आणि काळे कुट्ट तांबे नव्यासारखे लख्ख चमकवा

Copper Utensils Cleaning Tips
येथे क्लिक करा...