Copper Utensils Cleaning Tips: घरातल्या 'या' 2 गोष्टी एकत्र करा आणि काळे कुट्ट तांबे नव्यासारखे लख्ख चमकवा

Manasvi Choudhary

तांब्याची भांडी

तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. याशिवाय देवघरातील पूजेसाठीही तांब्याच्या तांब्या, ताट आणि कळस वापरले जातात.

copper utensils | google

तांब्याची भांडी स्वच्छ करण्याच्या टिप्स

परंतु ही तांब्याची भांडी काळी लवकर पडतात. तांब्याची भांडी स्वच्छ करण्याच्या काही सोप्या टिप्स या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Copper Utensils Cleaning Tips | Google

घरगुती उपाय

तांबे हा धातू हवेतील ऑक्सिजन आणि ओलाव्याच्या संपर्कात आल्यामुळे खूप लवकर काळा पडतो. काळी पडलेली तांब्याची भांडी पितांबरी किंवा केमिकल घासण्याऐवजी सोप्या टिप्सने स्वच्छ करा.

Copper Utensils Cleaning Tips

पीठ आणि व्हिनेगर

चण्याचे पीठ आणि व्हिनेगर एकत्र करून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट काळ्या पडलेल्या तांब्याच्या भांड्यांवर लावा. ५ ते १० मिनिटांनंतर हलक्या हाताने घासून भांडी पाण्याने धुवून घ्या.

Besan & Vinegar | yandex

मीठ आणि लिंबाचा रस

मीठ आणि लिंबाचा रस एकत्र करून ते पाणी तांब्याच्या भांड्यावर टाका किंवा त्यात भांडी १० मिनिटे भिजत ठेवा. त्यानंतर लिंबाच्या सालीने किंवा मऊ कापडाने पुसल्यास काळेपणा झटपट निघून जाईल

Salt & Lemon Water | pinterest

मीठ आणि व्हिनेगरचे मिश्रण

मीठ आणि व्हिनेगर एकत्र करून ते मिश्रण काळ्या पडलेल्या भांड्यावर लावा किंवा त्या मिश्रणात भांडी १० मिनिटांसाठी ठेवून द्या. १० मिनिटांनंतर साध्या पाण्याने भांडी धुतल्यास तांब्याला चमक येईल.

Salt & Vinegar Soak | yandex

गव्हाचे पीठ, हळद आणि लिंबू पेस्ट

गव्हाचे पीठ, हळद आणि लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट बनवा. ही पेस्ट भांड्यांवर लावून १० मिनिटे ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवून वाळवा.

Flour, Turmeric & Lemon | pinterest

NEXT: Milk Bath Benefits: दुधाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे 5 चमत्कारिक फायदे, त्वचा आणि आरोग्यासाठी गुणकारी

Milk Bath Benefits
येथे क्लिक करा...