Rain Alert IMD Predicts Heavy Rainfall 14 july 2023 many District in maharashtra| Saam TV Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Rain Alert: राज्यात आज अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Weather Alert In Maharashtra: हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Weather Updates: दरवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात मान्सून उशीराने दाखल झाला. जुलै महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकला. त्यामुळे राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला.

मात्र, जुलै महिना सुरू होताच राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या असून काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे.

त्यामुळे पेरणीला पोषक असा पाऊस नेमका कधी पडणार? याची वाट राज्यातील शेतकरी पाहत आहे. अशातच हवामान खात्याने (IMD Alert) पुढील ३ दिवसात राज्यात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तवला आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यासह इतर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, गुरूवारी दिवसभरात मुंबईसह उपनगरात पावसानं जोरदार हजेरी लावली. त्याचबरोबर ठाणे, पालघर, वाशिम, यवतमाळ, नंदूरबार या जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला.

याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी (Rain News) लावली. बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, गोंदिया, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे बळीराजा सुखावला असून दुबार पेरणीचं संकट टळलं आहे.

दरम्यान, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, ठाणे, सातारा, सांगली, अहमदनगर, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये आज म्हणजेच १४ जुलै रोजी पावसाचा जोर कमी असेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT