Buldhana Crime News: राजूर घाटात फिरण्यासाठी गेले अन् घात झाला; महिलेवर ८ जणांकडून सामूहिक अत्याचार, संतापजनक घटना

Buldhana Rajur Ghat News: मित्रासोबत राजूर घाटात फिरण्यासाठी आलेल्या एका महिलेवर ८ नराधमांनी आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला.
Buldhana Rajur Ghat Women 8 Person Rape
Buldhana Rajur Ghat Women 8 Person Rape Saam TV
Published On

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana Crime News: बुलढाणा जिल्ह्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मित्रासोबत राजूर घाटात फिरण्यासाठी आलेल्या एका महिलेवर ८ नराधमांनी आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला.

गुरूवारी दुपारच्या सुमारास ही संतापजनक घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार बोराखेडी (Buldhana News) पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Buldhana Rajur Ghat Women 8 Person Rape
Pune Crime News: नवरा साखर झोपेत, बायको दबक्या पावलांनी आली अन्... पुण्यातील खळबळजनक घटना

बुलढाणा-मलकापूर मार्गावरील राजूर घाटात पावसाळ्यात निसर्गरम्य वातावरण असल्याने अनेक पर्यटक या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. गुरूवारी दुपारच्या सुमारास एक महिला आपल्या मित्रासोबत राजूर घाटात फिरण्यासाठी आली होती.

यावेळी देवीच्या परिसरात ते थांबले असताना अचानक ८ जणाचं टोळकं तिथे आलं. महिलेच्या मित्राला मारहाण करत या टोळक्याने चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील रक्कम काढून घेतली.

इतकंच नाही, तर या ८ नराधमांनी महिलेला दरीत ओढत नेले. तिथे तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार (Crime News) केला. बलात्कार केल्यानंतर हे आरोपी फरार होत असताना तक्रारकर्त्याने त्यांचा पाठलाग केला असता हे आरोपी मोहेगाव येथे गेले.

Buldhana Rajur Ghat Women 8 Person Rape
Wardha Crime News: भावाने घरातच पुरला बहिणीचा मृतदेह, वडील त्यावर झोपायचे, आईही बनली निर्दयी...

मोहेगावच्या लोकांनी त्यातील एक आरोपी राहुल राठोड नावाचा असल्याची माहिती तक्रारकर्त्याला दिली आहे. दरम्यान, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आरोपींविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल तीन तास पोलीस (Police) ठाण्यात ठिय्या दिला.

त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी देखील याच राजुर घाटात बरेचदा बलात्काराच्या घटना घडल्या असल्याची माहिती आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे. मात्र बदनामी पोटी तक्रारी दाखल केल्या जात नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com