Railway Weekly Special Train Schedule Saam Tv
मुंबई/पुणे

Railway Timetable: मुंबई-सोलापूर आणि सोलापूर-नागपूर-तिरुपती दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्या; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Railway Timetable For Mumbai-Solapur-Nagpur-Tirupati: मुंबई - सोलापूर आणि सोलापूर- नागपूर/तिरुपती दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे, मुंबई

Railway Weekly Special Train Schedule: सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने मुंबई आणि सोलापूर, सोलापूर आणि नागपूर तसेच सोलापूर आणि तिरुपती दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई - सोलापूर साप्ताहिक विशेष (पनवेल, लातूर, बिदर मार्गे)

गाडी क्रमांक 01436 विशेष दि. १४.१२.२०२२ ते १५.०२.२०२३ या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर बुधवारी १२.५० वाजता सुटेल आणि सोलापूर येथे दुसऱ्या दिवशी ०९.१५ वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01435 विशेष गाडी दि. १३.१२.२०२२ ते १४.२.२०२३ पर्यंत सोलापूर येथून दर मंगळवारी ०९.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल.

थांबे - ठाणे, पनवेल, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, बार्शी टाऊन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, बिदर, ताज सुलतानपूर, कलबुरगि जंक्शन, गाणगापूर रोड आणि अक्कलकोट रोड.

सोलापूर - नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट विशेष

गाडी क्रमांक 01433 विशेष गाडी दि. ११.१२.२०२२ ते १२.२.२०२३ पर्यंत दर रविवारी २०.२० वाजता सोलापूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १३.०५ वाजता नागपूर येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक 01434 विशेष गाडी दि. १२.१२.२०२२ ते १३.२.२०२३ पर्यंत दर सोमवारी १५.१५ वाजता नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०८.४० वाजता सोलापूर येथे पोहोचेल.

थांबे - कुर्डुवाडी, दौंड, अहमदनगर जंक्शन, बेलापूर, कोपरगाव, मनमाड जंक्शन, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा. (LIVE Marathi News)

सोलापूर - तिरुपती साप्ताहिक विशेष

गाडी क्रमांक 01437 विशेष दि. १५.१२.२०२२ ते १६.०२.२०२३ पर्यंत सोलापूर येथून दर गुरुवारी २१.४० वाजता सुटेल आणि तिरुपती येथे दुसऱ्या दिवशी १९.४५ वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01438 विशेष गाडी दि. १६.१२.२०२२ ते १७.२.२०१३ पर्यंत तिरुपती येथून दर शुक्रवारी २१.१० वाजता सुटेल आणि सोलापूर येथे दुसऱ्या दिवशी १९.१० वाजता पोहोचेल.

थांबे - कुर्डुवाडी, बार्शी टाउन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, हुमनाबाद, ताज सुलतानपूर, कलबुरगि, वाडी, यादगीर, रायचूर, मंत्रालयम रोड, अडोनी, गुंटकल जंक्शन, गूटी, तडीपात्री, येडगीर , राझमपेट आणि रेनिगुंटा जं. (Latest Marathi News)

संरचना: वरील सर्व विशेष ट्रेन दोन द्वितीय वातानुकूलित, ८ तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, आणि ३ सामान्य द्वितीय श्रेणीसह एक गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅनसह चालतील.

आरक्षण: विशेष गाड्यांसाठी बुकिंग

01433/01434/01436/01435 आणि 01437 विशेष शुल्कासह दि. ०४.१२.२०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होतील.

वरील विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

Mumbai Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची धडक, 7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT