१० वर्षांपूर्वी फार्म हाऊसवर कसे पकडले गेले? तिकीट कापल्यानंतर इच्छुक उमेदवाराचा भाजप आमदारावर गंभीर आरोप

Chandrapur politics : तिकीट कापल्यानंतर उमेदवाराने भाजप आमदारावर गंभीर आरोप केले. या इच्छुक उमेदवाराच्या आरोपाने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
maharashtra Politics
bjp Saam tv
Published On
Summary

चंद्रपुरात भाजप आमदारावर तिकीट कापलेल्या उमेदवाराचा गंभीर आरोप

अजय सरकार यांनी काढले जोरगेवार यांचे फॉर्महाऊस कांड

जोरगेवार यांच्यावर सरकार यांच्यावर हल्लाबोल

चंद्रपुरात भाजपमध्ये ज्या उमेदवारावरून सकाळपासून वाद सुरू आहे, तो शांत होण्याची चिन्हे दिसत नाही. वीस गुन्हे दाखल असलेले उमेदवार अजय सरकार यांचे तिकीट अखेर कापण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या अजय सरकार यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर तेवढेच गंभीर आरोप केले.

आमदार जोरगेवार यांनीच अजय सरकार यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला होता आणि शेवटी त्यांची तिकीट कापण्यात यशस्वी झाले. या घटनाक्रमानंतर अजय सरकार आता आक्रमक झाले असून, त्यांनी जोरगेवार यांच्यावर थेट हल्लाबोल केला.

maharashtra Politics
Beed : बीडमध्ये पुन्हा धक्कादायक प्रकार; टोलनाक्यावर भावा बहिणीसह भाच्याला बेदम मारहाण

'मला क्रिमिनल संबोधण्याआधी तुम्ही दहा वर्षांपूर्वी फॉर्म हाऊसवर कसे पकडले गेले आणि पन्नास लाख रुपये देऊन कसे सुटले, हे मला माहिती आहे, असा गौप्यस्फोट सरकार यांनी केला. तुमचा मुलगा ड्रग्स प्रकरणात सापडल्यावर दहा लाख देऊन त्याला कसे सोडवले, तुमचा मुलगा रात्रीच्या वेळी कोणत्या मुलींना घेऊन जातो, हे सर्व मला माहित आहे. शिवाय माझ्यावर वीस गुन्हे असल्याचे जोरगेवार म्हणाले.

maharashtra Politics
झटपट पटापट! फोन येताच भाजपच्या कोणत्या नेत्यांनी भरला उमेदवारीचा अर्ज? पुण्यातील यादी आली समोर

'ते चुकीचे बोलले. माझ्यावर 33 गुन्हे दाखल असून, ते राजकीय स्वरूपाचे आहेत. त्यांची सेवा करीत होतो, तेव्हा गुन्हेगार नव्हतो. आता तिकीट द्यायची वेळ आली, तर गुन्हेगार झालो काय, असा संतप्त सवालही सरकार यांनी केला.

Q

चंद्रपुरात भाजपमध्ये वाद कशामुळे सुरू झाला?

A

अजय सरकार यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. या कारणावरून भाजपने त्यांचे तिकीट कापले. त्यानंतर या वादाला तोंड फुटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com