

पुण्यात भाजप-शिवसेना युतीबाबत मोठी अपडेट
जागावाटपावरून दोन्ही पक्षांत तीव्र मतभेद
शिवसेनेने भाजपकडे १५ उमेदवारांची यादी पाठवली
शिवसेनेकडून भाजपला प्रस्तावात दिलेल्या जागांची यादी "साम" च्या हाती लागली आहे. शिवसेनेने 15 नावं दिली पण भाजपने वाचून चर्चाच बंद केली का काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. "त्या १५ जणांची यादी आता "साम" च्या हाती लागली आहे. भाजप - शिवसेना युतीच्या चर्चा या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तासापर्यंत संपल्या नव्हत्या. भाजप आणि सेनेतील संघर्ष प्रस्तावित यादीतील नावांमुळे सुरू झाला अशी शक्यता आहे.
सामच्या हाती आलेल्या माहितीनुसार शिवसेनेनं भाजपकडे नवीन १५ जागांवरील उमेदवारांच्या नावांची यादी पाठवली होती. या यादीनंतर भाजपनं युतीची चर्चा बंद केली. या यादीतील काही अशी नावे आहेत, ज्यावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला. यादीत रवींद्र धंगेकर यांच्या घरातील दोन नाव आहेत. आबा बागुल यांची नावे आहेत, त्यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला होता.
१५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि शिवसेना युतीमध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवेल असे जाहीर केले. त्यानंतर शिवसेनेकडून भाजपला तब्बल 41 जागांचा प्रस्ताव देण्यात आला. भाजप ने या प्रस्तावाला "सन्मानपूर्वक" उत्तर दिलं नसल्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेने भाजपकडे अवघ्या 15 जागांचा प्रस्ताव पाठवला.
या जागांच्या प्रस्तावामध्ये शिवसेनेचे पुणे महानगरपालिकेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांच्या कुटुंबीयांसाठी दोन जागांचा प्रस्तावाचा समावेश करण्यात आला. तसंच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केलेल्या आबा बागुल यांच्या प्रभागाचा सुद्धा उल्लेख करण्यात आला.
आता रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजप हे समीकरण उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. काही महिन्यांपूर्वी धंगेकर यांनी पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत अनेक वेळा माध्यमांमधून टीका केली होती. धंगेकर यांच्या २ जागा तसंच काँग्रेस मधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या आबा बागुल यांची एक जागा आणि इतर अशी १५ नावांची यादी शिवसेनेने २८ डिसेंबर रोजी भाजपला पाठवली. भाजपकडून या यादीवर काहीच उत्तर आलं नाही? का यातील नावं बघून भाजपने सेनेसोबत चर्चा थांबवली? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपकडून शिवसेनेला १६ जागांचा प्रस्ताव मान्य आहे मात्र ते सांगतील आणि ते देतील याच नावांचा आणि प्रभागांचा. त्यामुळे शिवसेनेने पाठवलेल्या प्रस्तावातील नावं भाजपने खोडली का त्यावर पुढे काहीच चर्चा झाली नाही हे फक्त दोन्ही पक्षातील नेत्यांना ठाऊक. दुसऱ्या बाजूला, आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे शिवसेनेने १३५ ते १४० ए बी फॉर्म दिले.
आज एका बाजूला रवींद्र धंगेकर यांनी युती तुटली असं सांगितलं पण त्यांचेच नेते उदय सामंत यांनी युती तुटलेली नाही अशी जाहीर घोषणा केली. "आम्ही "flexible" आहोत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल," अशी सावध भूमिका उदय सामंत यांनी घेतली. येत्या काही दिवसात उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू होईल आणि त्यानंतर ते मागे घेण्याच्या दिवसाला सुद्धा सुरुवात होईल.
त्यामुळे येत्या काळात जर युती कायम राहिली तर शिवसेना आज वाटलेले एवढे फॉर्म परत मागवणार कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे आणि युती तुटली तर शिवसेना आज दिलेल्या १३५ ते १४० ए बी फॉर्म नुसार शहरातील सर्वच प्रभागात लढणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
प्रभाग क्रमांक 41 ब मधून प्रमोद नाना भानगिरे,
41 क स्वाती अनंत टकले,
24 ड प्रणव रवींद्र धंगेकर,
23 क प्रतिभा रवींद्र धंगेकर,
26 ड उल्हास उर्फ वसंतराव बागुल,
37 क गिरीराज तानाजी सावंत,
37 ड रूपाली रमेश कोंडे,
38 क वनिता जालिंदर जांभळे,
38 इ स्वराज नमेश बाबर,
39 क मनिषा गणेश मोहिते,
6 ड आनंद रामनिवास गोयल,
3 क गायत्री हर्षवर्धन पवार,
16 ड उल्हास दत्तात्रय तुपे,
40 ड दशरथ पंढरीनाथ, काळभोर किंवा गंगाधर विठ्ठल बधे,
11 क वैशाली राजेंद्र मराठे यांचे नावं होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.