Maharashtra Vs Karnataka: सीमा भागातील गावांना आकर्षित करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra-Karnataka Border Dispute: या पूर्वी सीमाभागात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येक गावाला १ लाख रुपये दिले जात होते.
Eknath shinde And Devendra fadnavis
Eknath shinde And Devendra fadnavisSaam TV
Published On

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्रातील सीमावादाचा मुद्दा पेटलेला असताना कर्नाटक सरकारने सांगलीतील गावांना पाणी देऊन महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. आता याला प्रत्तुत्तर म्हणून महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील गावांना आकर्षित करण्यासाठी नवी खेळी खेळली आहे. सीमा भागातील गावांमध्ये मराठी भाषेच्या संवर्धनासाठी गावांना दिल्या जाणाऱ्या मदतीत दुप्पटीने वाढ केली जाणार असल्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. (Maharashtra - Karnataka Border Dispute)

Eknath shinde And Devendra fadnavis
राज्याच्या तिजोरीवर एका लुटारुला बसवत असाल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; नाना पटोलेंचा हल्लाबोल

या पूर्वी सीमाभागात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येक गावाला १ लाख रुपये दिले जात होते. मात्र सीमा प्रश्नावरून दोन राज्यात वाद उफळून आल्याने सीमा भागातील गावांना आकर्षित करण्यासाठी आणि त्या गावांमध्ये मराठीच्या संवर्धनासाठी प्रत्येक गावाला २ लाख ते जास्तीत जास्त १० लाख रुपये देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. येणाऱ्या कॅबिनेट बैठकीत या निर्णयाला मंजूरी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Maharashtra News)

Eknath shinde And Devendra fadnavis
Mumbai News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; मुंबईतील सेस इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

दरम्यान कर्नाटक सीमावादावरुन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री आमने-सामने आले आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात (Belgaum) येऊ नये असा इशाराच बोम्माईंनी दिला आहे. त्यामुळे येत्या काळात सीमावाद पेटणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील महाराष्ट्र्-कर्नाटक सीमाप्रश्‍न समन्वय मंत्री चंद्रकांत पाटील, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई आणि सीमाप्रश्‍न उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशिल माने येत्या ६ डिसेंबरला बेळगाव दौऱ्यावर जाणार आहेत.  (Latest Marathi News)

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com