Railway Ticket Saam Tv
मुंबई/पुणे

Railway Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! तिकीटासोबत हे ओळखपत्र सोबत ठेवा, नाहीतर भरावा लागेल दंड

Railway Ticket Rules: १ ऑक्टोबरपासून रेल्वे प्रवास करताना प्रवाशांना तिकीटासोबत ओळखपत्र ठेवावे लागेल. तिकीट तपासणीदरम्यान ओळखपत्र दाखवले नाही तर दंड आकारला जाईल.

Priya More
  • १ ऑक्टोबर २०२६ पासून रेल्वे तिकीट तपासणीचे नवीन नियम

  • रेल्वे प्रवास करताना मूळ ओळखपत्र सोबत ठेवावे लागणार

  • मध्य रेल्वेची १ ते ३१ ऑक्टोबर विशेष तिकीट तपासणी मोहीम

  • रेल्वे तिकीटासोबत ओळखपत्र नसल्यास दंड भरावा लागणार

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. यापुढे प्रवास करताना तुम्हाला तिकीटासोबत ओळखपत्र सोबत ठेवणे गरजेचे राहणार आहे. नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. कारण भारतीय रेल्वे १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत एक विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. या काळामध्ये तिकीटांची वैधता आणि सत्यता तपासण्यांवर विशेष भर दिला जाणार आहे. तिकीटासोबत एक मूळ ओळखपत्र न दाखवल्यास पीएनआरवरील सर्व प्रवाशांना दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे सर्व प्रवाशांनी आताच आपले ओळखपत्र बॅगमध्ये ठेवा जेणेकरून १ ऑक्टोबरपासून प्रवास करताना अडचण येणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत तिकीट तपासणीची एक विशेष मोहीम राबवणार आहे. यामध्ये प्रवाशांच्या तिकिटांची सत्यता आणि वैधता तपासल्या जाणार आहेत. स्थानकांवर आणि रेल्वे प्रवासादरम्यान तिकिटांची तपासणी केली जाणार आहे. त्याचसोबत सवलतीच्या दरातील तिकिटे, विशिष्ट आरक्षण कोटा आणि विविध पासद्वारे आरक्षित केलेल्या तिकिटांवर या मोहिमेत विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. आरक्षण सुविधांचा गैरवापर रोखणे, सवलती आणि पासचा फसवणुकीने होणारा वापर थांबवणे आणि रेल्वेच्या महसुलातील गळती रोखणे हा या मोहिमेमागचा मुख्य उद्देश आहे.

या मोहिमेदरम्यान, तिकीट तपासणी कर्मचारी हे सुनिश्चित करतील की सवलत किंवा विशिष्ट आरक्षण कोट्यांतर्गत प्रवास करणारे प्रवासी त्यांची पात्रता सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले विहित मूळ ओळखपत्र सोबत बाळगत आहेत. एकाच तिकिटावर अनेक प्रवाशांचे आरक्षण असल्यास त्या तिकिटावरील किमान एका प्रवाशाकडे ओळखपत्र असणे अनिवार्य असणार आहे. आवश्यक मूळ पुरावा नसल्यास लागू नियमांनुसार त्या तिकिटावर प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना वैध तिकिटाशिवाय प्रवास करणारे मानले जाईल. त्यांना दंड भरावा लागू शकतो.

विशिष्ट सवलती किंवा आरक्षण कोट्यांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे त्यांची पात्रता सिद्ध करणारी विहित मूळ कागदपत्रे आहेत की नाही, याचीही तपासणी केली जाणार आहे. तसेच, ई-पास/पीटीओ वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विहित मूळ ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक असेल. प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी ई-पास/पीटीओ च्या बदल्यात प्रवासासाठी आवश्यक अधिकृत तिकीट/पास मिळवला आहे याची तुम्ही खात्री करून घ्यावी जेणेकरून प्रवास व्यवस्तित होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Car tyre replacement: किती किलोमीटर्सनंतर कारचे टायर बदलले पाहिजेत?

Maharashtra Politics : राज ठाकरे इंडिया आघाडीत जाणार? संजय राऊतांचं मोठं विधान

Pitru Paksha : ना कांदा, ना लसूण; पितृपक्षात बनवा 'ही' झणझणीत रस्सा भाजी

Vinod Kambli: मुंबईतल्या पॉश एरियात आलिशान घर, तरीही विनोद कांबळी वृद्धाश्रमात का राहतो?

SCROLL FOR NEXT