Railway New Timetable Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Train Schedule: रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! आता दादर रेल्वे स्थानकातून सुटणार १० जलद लोकल; १ ऑगस्टपासून लागू होणार नवं वेळापत्रक

Mumbai Train New Timetable: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता दादर रेल्वे स्थानकातून १० जलद लोकल सुटणार आहे. सीएसएमटीहून येणाऱ्या लोकलमध्ये दादरमधील प्रवाशांना चढण्यास मिळत नव्हते. त्यामुळेच प्रवाशांचा हाल व्हायचे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Siddhi Hande

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता दादर स्थानकातून रोज १० लोकल फेऱ्या सुरु होत आहेत. सीएसएमटीहून सुटणाऱ्या लोकलमध्ये दादर येथे प्रवाशांना चढता येत नसल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रोज दादर येथे प्रवाशांना लोकलमध्ये चढता येत नसल्याच्या तक्रारी वारंवार प्रवासी रेल्वे प्रशासनाकडे करतात. त्याचीच दखल घेत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (Railway New Timetable)

परळच्या रेल्वे स्थानकातून अतिरिक्त १४ लोकल फेऱ्या सुरु होणार आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून हे नवं वेळापत्रक लागू होणार आहे.जलद लोकलच्या १० फेऱ्या या सीएसएमटीऐवजी दादरवरुन सुटणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार नाहीत.

या नव्या वेळापत्रकानुसार, सीएसएमटी ते ठाणे अशा ६ लोकल फेऱ्या कल्याणपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत.दादरमधून सुटणाऱ्या २४ धीम्या लोकल आता परळमधून सुटणार आहे. त्याऐवजी दादरमधून १० जलद लोकल सुटणार आहेत.या नवीन वेळापत्रकानुसार हार्बर लाइनच्या लोकल फेऱ्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सीएसएमटीहून सुटणाऱ्या लोकल या प्रवाशांनी खचाखच भरलेल्या असतात. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकावर प्रवाशांना चढायला मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना खूप वेळ रेल्वे स्थानकावरच थांबावे लागते. प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. त्याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT