Western Railway Police Saam TV
मुंबई/पुणे

Western Railway Police: रेल्वेत नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन; २१ कोटींची लूट, पश्चिम रेल्वेकडून बनावट रॅकेटचा पर्दाफाश

Railway Job Scam: गेल्या ३ महिन्यांपासून पथक या बनावट रॅकेटचा पाठलाग करत होतं. रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचं आश्वासन देऊन फसवणूक केली जातेय, अशा अनेक तक्रारी पोलिसांकडे येत होत्या.

Ruchika Jadhav

Western Railway:

सरकारी नोकरी मिळावी यासाठी प्रत्येक तरुण मेहनत करत असतो. अशात पश्चिम रेल्वेत नोकरी देणार, असं आश्वासन देऊन अनेक तरुणांची फसवणूक करण्यात आलीये. अशात पश्चिम रेल्वेने या जॉब रॅकेटचा परदाफाश केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, २ फेब्रुवारी रोजी पश्चिम रेल्वेच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. टीमने ३०० पेक्षा अधिक उमेदवारांची सुमारे २१ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या बनावट रॅकेटचा पर्दाफाश केलाय. गेल्या ३ महिन्यांपासून पथक या बनावट रॅकेटचा पाठलाग करत होतं. रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचं आश्वासन देऊन फसवणूक केली जातेय, अशा अनेक तक्रारी पोलिसांकडे येत होत्या.

त्यामुळे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पश्चिम रेल्वे दक्षता पथकाने बाहेरील व्यक्ती आणि दोन प्रॉक्सी उमेदवारांना रॅकेटचा शोध लावण्यासाठी फिल्डवर पाठवले. तपासात हरताली प्रसाद रोहीदास या गुन्हेगाराला मुंबई सेंट्रल स्टेशनवर भेटण्यासाठी बोलावण्यात आले. शुक्रवारी २ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता गुन्हेगार मुंबई सेंट्रल स्थानकाच्या पोर्चमध्ये आला त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली.

अटक केल्यानंतर त्याचा फोन तपासण्यात आला. त्यावेळी त्याच्या फोनमध्ये १८० व्यक्तींचे नंबर ब्लॉक करण्यात आले होते. बहुधा ब्लॉक केलेल्या व्यक्तींचे पैसे त्याने नोकरीचे आश्वासन देऊन लंपास केले होते. रोहीदासला कोलकत्ता येथील एक व्यक्ती खोटी कागदपत्रे बनवून देत होता, अशी माहिती देखील पोलीस तपासात उघड झाली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT