MLA Disqualification Result Saam tv
मुंबई/पुणे

Rahul Narvekar Video: शिवसेना शिंदेंची , मग ठाकरेंचे आमदारही पात्र कसे ठरले ... विधानसभा अध्यक्षांनी कोणत्या गोष्टी नमूद केल्या?

Rahul Narvekar on MLA Disqualification Result: खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असं मत नार्वेकरांनी व्यक्त केलं, तरी दुसरीकडे नार्वेकरांनी ठाकरेंचेही आमदार पात्र ठरवले. ठाकरेंच्या आमदारांना कसं पात्र ठरवलं,यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकालानंतर भाष्य केलं आहे.

Vishal Gangurde

Rahul Narvekar News:

शिवसेना फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आहे. शिवसेना आमदार पात्रता प्रकरणात निकाल देताना राहुल नार्वेकरांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या याचिका फेटाळल्या. आज बुधवारी निकालाचं वाचन करताना नार्वेकरांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला. मात्र, खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असं मत व्यक्त केलं, तरी दुसरीकडे नार्वेकरांनी ठाकरेंचेही आमदार पात्र ठरवले. ठाकरेंच्या आमदारांना कसं पात्र ठरवलं,यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकालानंतर भाष्य केलं आहे. (Latest Marathi News)

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आज बुधवारी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर निकाल दिला. नार्वेकरांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरविल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रश्नांवर चर्चा सुरु झाल्या आहेत. खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची असल्याचा निर्णय दिल्यानंतरही उद्धव ठाकरेंचे आमदार पात्र कसे ठरले, या प्रश्नावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालानंतर प्रतिक्रिया देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, 'आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देत असाताना कायद्याच्या सर्व तरतुदीचं पालन केलं आहे. संविधानाचं पालन केलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकषाच्या अनुषंगाने निर्णय घेतला आहे. आपल्याला माहीत आहे की, मुळ पक्ष कोणता, हे ठरविल्यानंतर त्या पक्षाच्या इच्छेनंतर त्या व्हीप मान्यता द्यावी लागते. शिंदे गटाने व्हीपला बजावल्यानंतरही तो योग्यरित्या बजावला गेला आहे का, हे बघावं लागतं'.

'निकालात खरी शिवसेना म्हणून शिंदे गटाच्या मान्यता देण्यात आली. त्यांच्या व्हीपला मान्यता दिली. मात्र, त्यांनी योग्यरित्या व्हीप बजावला नाही. त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलं नाही, असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.

निर्णय वाचल्यास संभ्रम दूर होईल : राहुल नार्वेकर

निकालानंतर ठाकरे गट कोर्टात जाणार आहे, यावर भाष्य करताना नार्वेकर म्हणाले, आपल्या देशात कोणत्याही व्यक्तीला कोणताही निकाल घटनाबाह्य वाटत असेल,तो व्यक्ती कोर्टात जाऊ शकतो. परंतु कोर्टात गेल्यानंतर याचिका दाखल केली. याचिका दाखल केली याचा अर्थ दिलेला निकाल चुकीचा ठरत नाही. कोर्टातील याचिका दाखल केल्यानंतर सिद्ध करावी लागते. मी दिलेला निर्णय नीट वाचल्यास, त्याच व्यवस्थित आकलन केल्यास संभ्रम दूर होईल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Pune Crime : कोंढवा तरुणी अत्याचार प्रकरणात पुन्हा ३६० डिग्री टर्न, आरोप असलेल्या तरुणाला अटकच नाही

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन हेकडी काढेन'; 'या' खासदाराचं राज ठाकरेंना आव्हान | VIDEO

SCROLL FOR NEXT