MLA Disqualification Result : राहुल नार्वेकरांनी पात्र ठरवलेले ते १६ आमदार कोण? त्यांच्याबद्दल जाणून घ्या

Shinde Group MLA: ठाकरे गटाने शिंदे गटातील ज्या १६ आमदारांना अपात्र ठरवले, होते त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव होतं. दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी आज निकाल देताना शिंदे गटातील सर्व आमदारांना पात्र ठरवलेत.
Shinde Group MLA
Shinde Group MLAReddiff
Published On

Shinde Group MLA Disqualification :

सर्व राज्याचे लक्ष लागलेल्या आमदार अपात्रेचा निकाल आज लागला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे गटालाच मूळ शिवसेना असल्याची मान्यता दिलीय. ५५ पैकी ३७ आमदार आमच्याकडे असल्याचा शिंदेंचा दावा ग्राह्य मानून शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला.(Latest News)

राहुल नार्वेकरांनी निकाल दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेच्या गटातील आमदारांकडून आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे. विक्रोळीमध्ये शिवसेना शिंदें गटाकडून फटाके फोडून मिठाई वाटत घोषणा आनंद साजरा करण्यात येत आहे. निवडणुक आयोगाकडे फक्त २०१८ पूर्वीची पक्षाची घटना उपलब्ध आहे, जी १९९९ ची आहे. ४ एप्रिल २०१८ साली पक्षाच्या घटनेत सुधारणा केल्याचा दावा करण्यात आला होता, पण पक्षाची सुधारित घटना अध्यक्षांना उपलब्ध झालेली नसल्याचं सांगण्यात येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिवसेनेची (Shivsena) नेतृत्व रचना पक्षाच्या घटनेप्रमाणे नाही. निवडणूक आयोगाकडे २०१८ ची घटना उपलब्ध नाही, त्यामुळे १९९ ची घटना मान्य करण्यात आलीय. दरम्यान शिवसेनेत २१ जून २०२२ रोजी फूट पडली होती. त्या ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत मागणी केली होती.

या १६ आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही नाव होते. शिंदेंसह चिमणराव पाटील, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदीपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाठ, लता सोनवणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, संजय रायमूळकर, रमेश बोरनारे, महेश शिंदे यांच्यावर अपात्रतेची तलवार होती.

अब्दुल सत्तार

काँग्रेसकडून शिवसेनेत आलेले अब्दुल सत्तारांनी २०१९ मध्ये विधानसभेची निवडणुकीत विजय मिळवला होता. शिंदेंनी बंड केल्यानंतर सत्तार हे शिंदे गटात गेले आहेत. सत्तार हे सिल्लोड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

चिमणराव पाटील :

हे पारोळा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. शिवसेना पक्षातर्फे महाराष्ट्राच्या १२व्या आणि १४व्या विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली होती. पारोळा मतदार संघातील चिमणराव पाटील हे शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार आहेत.

संदीपान भुमरे

हे छ.संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याचे आमदार आहेत. भुमरे पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

तानाजी सावंत

हे भूम/परंडा/वाशी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. सावंत हे फक्त २७० मतांची आघाडी घेऊन विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झालेले आहेत.

यामिनी जाधव

ह्या भायखळा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या सदस्या आहेत.

भरत गोगावले

हे कोकणातील महाड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. हे तीन वेळा आमदारकीची निवडणूक जिंकलेत.

संजय शिरसाठ

हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. शिवसेनेकडून तीनदा विधानसभेवर निवडून गेलेत.

बालाजी किणीकर

हे अंबरनाथ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. बालातजी किणीकर हे सलग तीनवेळा आमदारकीची निवडणूक जिंकलेत.

बालाजी कल्याणकर

नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार आहेत. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

अनिल बाबर

हे सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. यांचाही प्रवासही काँग्रेसनंतर राष्ट्रवादी त्यानंतर शिवसेना असा आहे.

संजय रायमूळकर

हे मेहेकर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. दोनवेळा आमदारकी निवडणूक हे जिंकलेत.

रमेश बोरनारे

वैजापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ते ५७,००० मतांनी विजयी झाले होते.

बालाजी कल्याणकर

नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार आहेत. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

अनिल बाबर

हे सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. यांचाही प्रवासही काँग्रेसनंतर राष्ट्रवादी त्यानंतर शिवसेना असा आहे.

संजय रायमूळकर

हे मेहेकर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. दोनवेळा आमदारकी निवडणूक हे जिंकलेत.

रमेश बोरनारे

वैजापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ते ५७,००० मतांनी विजयी झाले होते.

महेश शिंदे

हे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. २०१९ विधानसभा निवडणुकीत महेश शिंदे यांनी पहिल्यांदाच विजय मिळवला होता.

Shinde Group MLA
MLA Disqualification Result: आधी धक्का नंतर दिलासा; राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाचे आमदारही ठरवले पात्र

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com