Devendra Fadnavis On Rahul Gandhi Saam TV
मुंबई/पुणे

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी; देवेंद्र फडणवीस

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची आज सोमवरी नॅशनल हेराल्डच्या कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी ई़डी कार्यालयात चौकशी सुरु आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आज सोमवरी नॅशनल हेराल्डच्या कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी ई़डी कार्यालयात चौकशी सुरु आहे. राहुल गांधीना चौकशीला बोलावल्याच्या विरोधात काँग्रेसकडून केंद्रीय यंत्रणांच्या विरोधात निदर्शन सुरु आहेत. राहुल गांधी चौकशीला जात असताना प्रियांका गांधी वड्रा देखील उपस्थित होत्या.

राहुल गांधींच्या आजच्या या कारवाईबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे. ते म्हणाले, ' आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ईडीने चौकशी झाली, मात्र, काँग्रेसने आज जनतेला वेठीस धरण्याचे काम केले. ही चौकशी झाली ती न्यायालयाच्या निर्णयानंतर झाली आहे. ५ हजार स्वातंत्र्य संग्रामातील सैनिक त्या कंपनीचे मालक होते, राहुल गांधी आणि त्यांच्या परिवाराने यंग इंडियन कंपनी सुरू केली, एजेएलच्या कंपनीवर आपली मालकी प्रस्थापित केली.

हे देखील पाहा -

स्वांतत्र्यसैनिकांच्या मालकीची असणाऱ्या कंपनी आणि २ हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी त्यांनी हडप केली. हा मॅटर कोर्टात गेलं त्यावेळी २०१९ ला दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) हा सरळ सरळ भ्रष्टाचार असल्याचे न्यायालयाने सांगितले होतं, एजेएल ही राष्ट्रीय संपत्ती आहे, ती जर कोणी प्रायव्हेट करत असेल तर ही कारवाई होणं स्वाभाविक आहे. जी चौकशी चालू आहे ते फेस करायला हवी असं फडणवीस म्हणाले.

तसंच या राहुल गांधींच्या या चौकशी दरम्यान एक पोस्टर काँग्रेसकडून दाखविण्यात आलं त्यावरती लिहलं होते की, मै राहुल गांधी हुँ, सावरकर नही हूँ मै माफी नहीं मांगुंगा अशा आशयाचं पोस्टर दाखवलं होतं ते अतिशय चुकीचं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी (Savarkar) ११ वर्षे अंदमानमधील सेल्युलर जेलमध्ये कोलू चालवला, स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी काळ्यापाण्याची शिक्षा देशासाठी भोगली त्याच सावरकरांना काँग्रेस अपमानित करत आहे.

२ हजार करोड रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केल्या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच या देशात सर्वसामान्य जनतेसाठी एक न्याय आणि राहुल गांधी यांना दुसरा असे होणार नाही असं सूचक वक्तव्य देखील केलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood : तिने अभिताभ बच्चनशी संबंध... विवाहबाह्य संबंधांवर रेखा यांचे वडील काय म्हणाले?

Maharashtra Rain Live News: पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

ठाणे, दादर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तोबा गर्दी, VIDEO

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनर उलटला; रस्ता ब्लॉक, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai Vada Pav : मुंबईच्या वडापावला मिळाला दक्षिण भारतीय ट्विस्ट! नवा फ्युजन फ्लेवर सोशल मीडियावर चर्चेत

SCROLL FOR NEXT