Harshawardhan Sakapal Rahul Gandhi Pune Event ABVP-NSUI Clash Ahead of Chhatron Ki Goonj Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : "भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे" राहुल गांधींच्या कार्यक्रमाआधी पुण्यात राडा, हर्षवर्धन सपकाळ संतापले

Pune Congress Chhatron Ki Goonj Update : राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाआधी पुण्यातील सीईओपी परिसरात अभाविप-एनएसयूआय कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की आणि मारहाणीचा आरोप. हर्षवर्धन सपकाळांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली.

Alisha Khedekar

  • राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाआधी पुण्यात अभाविप-एनएसयूआयमध्ये वाद

  • सीईओपी विद्यापीठ परिसरात दोन्ही गटांकडून एकमेकांवर मारहाणीचे आरोप

  • हर्षवर्धन सपकाळ यांनी कार्यक्रम उधळण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप केला

  • एका विद्यार्थिनीने अभाविप कार्यकर्त्यांसह पुरुष पोलिस अधिकाऱ्याकडून मारहाणीचा आरोप केला

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुण्यात ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, कार्यक्रमाच्या काही तास आधीच शिवाजीनगर येथील सीईओपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत दोन्ही गटांकडून मारहाण झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुणे काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत तीव्र प्रतिक्रिया दिली. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे भाडोत्री गुंड पाठवून कार्यक्रम उधळण्याचा आणि स्टंट करण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप सपकाळ यांनी केला.

सपकाळ म्हणाले की, सीईओपीच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करणे आणि विद्यार्थिनींना खोलीत डांबून ठेवणे हा अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार आहे. राहुल गांधी यांचे स्टेटस ठेवल्यामुळे विद्यार्थिनींना धमकावण्याचा किंवा त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा अधिकार अभाविपच्या कार्यकर्त्यांना कोणी दिला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“विचारांचा सामना विचारांनी करता येत नसल्याने मारहाण, धमकी आणि दहशतीचा मार्ग स्वीकारला जात आहे. हीच भाजपच्या विद्यार्थी राजकारणाची संस्कृती असल्याचे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले,” अशी टीका सपकाळ यांनी केली. तसेच या प्रकरणात सरकारकडून अभाविपच्या कार्यकर्त्यांना संरक्षण दिले जात आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आणि अधिकारांसाठी राहुल गांधींचा संवाद कार्यक्रम ऐतिहासिक स्वरूपात पार पडेल, असा विश्वासही सपकाळ यांनी व्यक्त केला.

दरम्यान, एका विद्यार्थिनीनेही या घटनेबाबत गंभीर आरोप केले. आम्ही शांततेत बसलेलो असताना अभाविपचे कार्यकर्ते आक्रमक होऊन अंगावर धावून आल्याचे तिने सांगितले. झालेल्या झटापटीदरम्यान पुरुष पोलिस अधिकाऱ्याने लाठीने तसेच बुटाने पायावर मारहाण केल्याचा आरोपही तिने केला. अभाविपच्या कार्यकर्त्यांनीही मारहाण केल्याचे तिचे म्हणणे आहे. या आरोपांवरून पुण्यातील विद्यार्थी राजकारण पुन्हा एकदा तापले असून, पोलिसांच्या तपासानंतर नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लातूर जिल्हा बँकेची ‘शुभमंगल’ योजना; शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज

पोयसर-कांदिवली हादरवणाऱ्या टोळीला मोठा दणका; दरेकर दादाविरुद्ध तब्बल ३७ गुन्हे दाखल

Saturday Horoscope : डोकं शांत ठेवा! या 4 राशींना मिळणार मानसिक शांतता, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Fact-Check: रक्षाबंधनाला शेतकऱ्यांना 4 हजार रूपये? केंद्र सरकार शेतकऱ्यांना वाढीव 2 हजार देणार?

Gold Prices: सोनं का महागतंय? सोनं 3 लाखांच्या पार जाणार?

SCROLL FOR NEXT