Vastu Tips Inauspicious Signs : हातातून ‘या’ 5 वस्तू खाली पडल्या तर मानलं जातं अशुभ; कुटुंबावर येऊ शकतं संकट?

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक लहान-सहान गोष्टींना आणि घटनांना विशेष महत्त्व दिले आहे.

Vastu Tips Inauspicious Signs | GOOGLE

हातातू वस्तू पडणे मानले जाते अशुभ

बऱ्याचदा आपल्याकडून नकळत घरात काही वस्तू हातातूनखाली पडतात आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु, वास्तुशास्त्रानुसार काही विशिष्ट वस्तूंचे हातातून खाली पडणे हे भविष्यात घडणाऱ्या वाईट घटनांचे किंवा संकटांचे संकेत मानले जाते.

Vastu Tips Inauspicious Signs

कोणत्या ५ वस्तू हातातून खाली पडू देऊ नका

हातातून कोणत्या 5 वस्तूंचे पडणे अशुभ मानले जाते, याविषयी वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Vastu Tips Inauspicious Signs | Social Media

हातातून दिवा पडणे

पूजेच्या किंवा आरतीच्या वेळी जर अचानक हातातून दिवा खाली पडला, तर ते अत्यंत अशुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. अशा वेळी तात्काळ देवाची क्षमा मागून दुसरा दिवा प्रज्वलित करावा.

Falling of Diya

देव-देवतांची मूर्ती खाली पडणे

वास्तुशास्त्रानुसार, जर तुमच्या हातातून चुकून देव-देवतांची मूर्ती किंवा प्रतिमा खाली पडली, तर हे घरात येणाऱ्या एखाद्या मोठ्या संकटाचे किंवा कुटुंबातील सदस्यावर येऊ शकणाऱ्या अडचणीचे लक्षण मानले जाते.

Falling of Idols | Canva

पूजेचा कलश पडणे

पूजा किंवा शुभ कार्यासाठी वापरण्यात येणारा कलश अचानक हातातून सरकून खाली पडणे किंवा सांडणे अत्यंत अशुभ मानले जाते. हे भविष्यात कुटुंबावर मोठे संकट ओढवण्याचे किंवा आर्थिक नुकसान होण्याचे संकेत देऊ शकते.

Falling of Kalash

हातातून प्रसाद खाली सांडणे

देवाला नैवेद्य दाखवताना किंवा वाटताना जर हातामधून प्रसाद खाली सांडला, तर याला देव अनादर मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार हातातून प्रसाद पडणे देखील अशुभ मानले गेले आहे.

Falling of Prasad | yandex

कुंकू खाली पडणे

हिंदू धर्मात कुंकू हे माता लक्ष्मीचे, अखंड सौभाग्याचे आणि वैवाहिक आयुष्याचे प्रतीक मानले जाते. जर तुमच्या हातातून कुंकूची डबी किंवा कुंकू जमिनीवर सांडले, तर ते अपशकुन मानले जाते आणि आगामी काळात काही अडचणी येण्याचे संकेत यात मानले जातात.

Falling of Kumkum/Sindoor | GOOGLE

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Pitrupaksha And Crow Importance: पितृपक्षात कावळ्याला अन्न का दिले जाते? कावळ्याचे एवढे महत्व का? समजून घ्या

Pitrupaksha And Crow Importance
येथे क्लिक करा...