Pitrupaksha: पितृपक्षात कावळ्याला अन्न का दिले जाते? कावळ्याचे एवढे महत्व का? समजून घ्या

Manasvi Choudhary

पितृपक्ष

हिंदू धर्मानुसार, पितृ पक्ष हा काळ आपल्या दिवंगत पूर्वजांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या १५ दिवसांच्या काळात पूर्वजांचे तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध विधी केले जातात. या सर्व विधींमध्ये कावळ्याला विशेष महत्व आहे.

Pitrupaksha | Google

पितृपक्षात कावळ्याला एवढे महत्व का?

परंतु, अनेकांच्या मनात प्रश्न येतो की, इतर प्राण्यांऐवजी विशेषतः पितृपक्षात कावळ्यालाच एवढे महत्त्व का दिले जाते? त्यामागील धार्मिक आणि पौराणिक कारण या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Pitrupaksha And Crow Importance

यमदेवाशी आणि पूर्वजांशी संबंध

हिंदू पौराणिक ग्रंथांनुसार आणि 'गरुड पुराण' मध्ये सांगितल्याप्रमाणे, कावळा हा मृत्यूची देवता असणाऱ्या यमदेवाशी जोडलेला मानला जातो. असे मानले जाते की, पितृपक्षात कावळ्याला दिलेले अन्न थेट आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचते.

Connection with Yamraj and Ancestors | News24

मानव आणि पितरांचा दुवा

धार्मिक मान्यतेनुसार, कावळा हा मानव आणि पितर यांच्यातील एक दुवा मानला जातो. पूर्वज पितृपक्षात कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात आणि आपल्या कुटुंबाने दिलेले अन्न ग्रहण करतात, अशी श्रद्धा आहे.

Medium Between Humans and Ancestors | Google

श्राद्ध विधीची फलप्राप्ति

श्राद्ध विधी पूर्ण केल्यानंतर जेवणाचा पहिला हिस्सा कावळ्यासाठी काढला जातो. कावळ्याने ते अन्न खाल्ले म्हणजे पितरांनी ते स्वीकारले आणि ते तृप्त झाले, असे मानले जाते. जर कावळ्याने अन्न खाल्ले नाही, तर श्राद्ध विधी अपूर्ण राहिल्याची भीती पूर्वीच्या काळी व्यक्त केली जायची.

Fulfillment of Shradh Ritual | Google

पौराणिक कथा आणि वरदान

पौराणिक कथेनुसार, देवतांचा राजा इंद्र याचा पुत्र जयंत याने कावळ्याचे रूप धारण करून सीतेची परीक्षा घेतली होती. त्यानंतर भगवान श्रीरामाने कावळ्याला वरदान दिले होते की, कावळ्याला दिलेले अन्न हे पूर्वजांच्या तृप्तीचे कारण बनेल. तेव्हापासून ही परंपरा चालत आली आहे.

Mythological Belief

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: Neem Water Bath Benefits: कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे ५ जबरदस्त फायदे; त्वचा आणि आरोग्यासाठी फायदेशीर

Neem Water Bath Benefits
येथे क्लिक करा...