White Forest Cake Recipe: घरच्या घरी बनवा बेकरीसारखी चव स्वादिष्ट व्हाईट फॉरेस्ट केक, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

केकसाठी साहित्य तयार करा

मैदा, पिठीसाखर, अंडी किंवा अंड्याचा पर्याय, बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स, दूध आणि बटर अशी प्राथमिक सामग्री घ्या. सर्व साहित्य खोलीच्या तापमानावर असल्यास केकची टेक्सचर चांगली येण्यास मदत होते.

White Forest Cake Recipe

केकचं बॅटर तयार करा

एका भांड्यात अंडी आणि साखर चांगली फेटा. त्यात व्हॅनिला इसेन्स आणि वितळलेलं बटर घाला. नंतर चाळलेला मैदा व बेकिंग पावडर थोडं-थोडं घालून हलक्या हाताने मिक्स करा.

White Forest Cake Recipe

केक बेक करून घ्या

बॅटर ग्रीस केलेल्या केक टिनमध्ये ओता. आधी गरम केलेल्या ओव्हनमध्ये साधारण १७०-१८०°C वर २५-३० मिनिटे बेक करा. टूथपिक घातल्यावर स्वच्छ बाहेर आली तर केक तयार आहे.

White Forest Cake Recipe

साखरेचा सिरप तयार करा

एका पॅनमध्ये थोडं पाणी आणि साखर घेऊन हलकं गरम करा. मिश्रण थंड झाल्यावर त्यात थोडा व्हॅनिला इसेन्स घालू शकता. यामुळे केकला ओलावा आणि चव मिळते.

White Forest Cake Recipe

केकचे थर तयार करा

पूर्ण थंड झालेला स्पॉंज केक आडवा कापून दोन किंवा तीन थर करा. प्रत्येक थरावर तयार केलेला साखरेचा सिरप हलका ब्रशने लावा.

White Forest Cake Recipe

व्हिप्ड क्रीम आणि चेरीचा थर लावा

प्रत्येक थरावर व्हिप्ड क्रीम पसरवा आणि त्यावर बारीक चिरलेल्या चेरीचे तुकडे घाला. त्यावर दुसरा थर ठेवून पुन्हा क्रीम आणि चेरीचा थर तयार करा.

White Forest Cake Recipe

व्हाईट चॉकलेटने सजवा

केकच्या बाहेरील बाजूस व्हिप्ड क्रीमचा थर लावा. त्यावर किसलेलं व्हाईट चॉकलेट, चेरी आणि क्रीमच्या छोट्या रोझेट्सने सजावट करा. केक काही तास फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर सर्व्ह करा.

White Forest Cake Recipe

Skin Care: चेहरा हायड्रेट आणि ग्लोईंग पाहिजे? मग रोज रात्री लावा 'ही' 2 मिनिटात तयार होणारी पेस्ट

Skin Care | Saam Tv
येथे क्लिक करा