Rahul Gandhi On Gautam Adani Saam Tv
मुंबई/पुणे

Rahul Gandhi On Gautam Adani: 'मोदींनी अदानींना एवढी मोकळीक का दिलीय?', राहुल गांधींचा सवाल

Rahul Gandhi Today Press Conference: 'मोदींनी अदानींना एवढी मोकळीक का दिलीय?', राहुल गांधींचा सवाल

Satish Kengar

Rahul Gandhi On Gautam Adani: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची अदानी समूहाच्या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारला पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. मुंबईत इंडिया आघाडीची आज उद्या असे दोन दिवस बैठक पार पडत आहे. याआधीच त्यांनी पत्रकार परिषद घेत अदानी समूहाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या जवळच्या सहकाऱ्याने (गौतम अदानी) शेअर्ससाठी अब्जावधी डॉलर्स वापरले. यात प्रश्न असा आहे की हा पैसे कोणाचा आहे? अदानींचे की अन्य कोणाचे? याची चौकशी झाली पाहिजे.

ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या जवळच्या सहकाऱ्याने (गौतम अदानी) शेअर्ससाठी अब्जावधी डॉलर्स वापरले. यात प्रश्न असा आहे की हा पैसे कोणाचा आहे? अदानींचे की अन्य कोणाचे? याची चौकशी झाली पाहिजे. (Latest Marathi News)

राहुल गांधी यांचे प्रश्न...

1. राहुल गांधी म्हणाले की, पहिला प्रश्न उद्भवतो - हा पैसा कोणाचा आहे? हा पैसा अदानींचा आहे की दुसऱ्याचा कोणाचा? यामागचा सूत्रधार विनोद अदानी नावाचा गृहस्थ गौतम अदानी यांचा भाऊ आहे. या गैरव्यवहारात आणखी दोन जणांचाही सहभाग आहे. एक नासिर अली शाबान अली नावाचा गृहस्थ आणि दुसरा चांग चुंग लिंग नावाचा चिनी गृहस्थ.

2. ते पुढे म्हणाले की, दुसरा प्रश्न उद्भवतो - या दोन परदेशी नागरिकांना त्यातील एका कंपनीच्या मूल्यांकनाशी खेळण्याची मुभा का दिली जात आहे, जे जवळजवळ सर्व भारतीय पायाभूत सुविधांवर नियंत्रण ठेवते.

3. राहुल गांधी म्हणाले की, तपास झाला, पुरावे सेबीला देण्यात आले आणि सेबीने गौतम अदानी यांना क्लीन चिट दिली. अदानींना क्लीन चिट देणारी व्यक्ती आज अदानीच्या कंपनीत संचालक आहे. हे स्पष्ट आहे की, येथे काहीतरी चुकीचं घडलं आहे.

काय आहे प्रकरण?

हिंडेनबर्गनंतर हिंडेनबर्गनंतर ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टने प्रसिद्ध केलेल्या अहवालात अदानी समूहावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अदानी समूहाने गुपचूप स्वत:चे शेअर्स खरेदी करून शेअर मार्केटमध्ये लाखो डॉलर्सची गुंतवणूक केल्याचे या अहवालातून उघड झाले आहे.

ओसीसीआरपी या ना-नफा माध्यम संस्थेने अदानी ग्रुपसंदर्भातील अहवाल आज प्रसिद्ध केला. या अहवालामध्ये त्यांनी अदानी ग्रुपवर स्वत:चे शेअर खरेदी करुन ते शेअर बाजारामध्ये लाखो डॉलर्सने गुंतवल्याचा आरोप करण्यात आला आहे. ओसीसीआरपीकडून करण्यात आलेल्या या आरोपाचा मोठा फटका अदानी ग्रुपला बसला आहे.

या प्रकरणाची जेपीसी चौकशी व्हावी: राहुल गांधी

अदानींच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी शांत का आहेत, असाही प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची जेपीसी चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT