Rahul Gandhi  Saam tv
मुंबई/पुणे

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या जीवाला धोका, कोर्टात दिली खळबळजनक माहिती

Rahul Gandhi News : मतदारयादीतील कथित गैरप्रकाराचा मुद्दा ऐरणीवर आलाय. मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका असल्याची माहिती राहुल गांधींनी कोर्टात माहिती दिली.

Vishal Gangurde

मतचोरीचा मुद्दा मांडल्याने जीवाला धोका

काँग्रेस नेते राहुल गांधींचा दावा

पुण्यातील विशेष न्यायालयात लेखी स्वरुपात दिली माहिती

भाजप नेत्यांनी धमकीसदृश विधानं केल्याचा आरोप

सागर आव्हाड, साम टीव्ही

मतदारयादीतील कथित गैरप्रकाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. काँग्रेसने या कथित गैरप्रकारावरून निवडणूक आयोगाला घेरलं आहे. राहल गांधी आणि काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात रान पेटवलं आहे. या प्रकरणामुळे माझ्या जीवाला धोका असल्याची माहिती राहुल गांधी यांनी पुणे कोर्टात दिली आहे.

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बदनामी केल्या प्रकरणाची सुनावणी पुणे कोर्टात झाली. या सुनावणीदरम्यान राहुल गांधी यांची बाजू वकील मिलिंद पवार यांनी मांडली. कोर्टात राहुल गांधींनी लेखी स्वरुपात लोकसभा निवडणुकीतील मतचोरीचा मुद्दा उपस्थित केला.

माझ्या जिवाला धोका - राहुल गांधी

'२०२४ मधील लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतचोरीचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे, अशी माहिती लेखी स्वरुपात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पुण्यातील विशेष न्यायालयात दिली. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरुद्ध पुण्यातील न्यायालयात खटला दाखल आहे. त्यावरील सुनावणीवेळी राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी ही माहिती लेखी स्वरुपात न्यायालयात दिली.

मिलिंद पवार यांनी न्यायालयात दिलेल्या लेखी माहितीनुसार, भाजपचे नेते तरविंदर मारवा यांनी म्हटलं आहे की, राहुल गांधी यांनी नीट वागावे, नाहीतर त्यांच्या आजीचे (इंदिरा गांधी) जे झाले, तेच राहुल गांधी यांचे होईल. भाजपाच्या आणखी एका नेत्याने राहुल गांधी यांना दहशतवादी म्हटलं आहे. सध्याचे राजकीय वातावरण आणि या खटल्यातील याचिकाकर्ते सत्यकी यांचे गोडसे घराण्याशी असलेले संबंध पाहाता राहुल गांधी यांच्या जीवाला धोका आहे. हिंदूत्वाचे समर्थन करणारे जहालमतवादी यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे कारण राहुल गांधी यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी विशेष न्यायालयाला लिहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Vs India: पाकिस्तानचे राज्यकर्ते का माजले? अमेरिकेच्या अणुबॉम्बवर पाकच्या उड्या?

Independence Day: 15 ऑगस्टला मांसाहारावर बंदी का? पालिकांचा मटणबंदीचा तुघलकी फतवा

Maharashtra Live News Update: स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विठ्ठल- रूक्मिणी मंदिरावर विद्युत रोषणाई

Airtel: कमी किंमतीत जास्त डेटा! महिन्याचा प्लॅन ६० जीबी डेटा आणि जबरदस्त बचत

खुशखबर! ICICI बँकेने मिनिमम बँलेंसची लिमिट घटवली, आता अकाउंटमध्ये एवढे पैसे ठेवावे लागणार

SCROLL FOR NEXT