NCP Meeting For Rajysabh Election Saam Tv
मुंबई/पुणे

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतील १० नेत्यांमध्ये शर्यत; उद्या जाहीर होणार उमेदवाराचे नाव

NCP Meeting For Rajya Sabha Election : आज अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली देवगिरी बंगल्यावर राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. या बैठकीत उमेदवार कोण असेल याची चर्चा झाली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ते १० नेत्यांची नावे उमेदवारीच्या शर्यतीत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(रुपाली बडवे, मुंबई)

NCP १० leaders Name In Race Of Rajya Sabha Election Candidate :

भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यसभा निवडणुकीसाठी तयारीला लागलाय. सर्व पक्ष उमेदवारी कोणाला द्यायची याची चाचपणी करत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत कोणाला उमेदवारी द्यायची यासाठी अजित पवार गट राष्ट्रवादी पक्षाची आज बैठक पार पडली. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत उमेदवाराच्या नावांची चर्चा झाली. मात्र उमेदवाराच्या नावावर आजही शिक्कामोर्तब अद्याप झालेलं नाही. (Latest News)

राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंगने जोर धरलाय. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवगिरी बंगल्यामध्ये काँग्रेस नेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, रामराजे निंबाळकर, अमोल मिटकरी, बाबा सिद्धिकी, पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी पक्षातील ८ ते १० नेत्यांची नावे राज्यसभेच्या उमेदवारीच्या शर्यतीत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाबा सिद्धीकी यांची उमेदवारीसाठी वर्णी लागण्याची चर्चा आहे. बाबा सिद्धीकी यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. बैठकीला हजर असलेल्या नेत्यांपैकी १० नेत्यांच्या उमेदवारी अर्जावर सह्या घेण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आजच्या बैठकीला सर्व आमदारांना बोलवण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल यावर चर्चा झाली. यानंतर उमेदवारी अर्जावर आमदारांच्या सह्या घेण्यात आल्या. आमदारांसोबत चर्चा झाल्यानंतर आता वरिष्ठ नेते एकत्र बसून उमेदवार कोण असेल निश्चित केलं जाईल. दरम्यान, महायुतीचे सर्व उमेदवार १५ फेब्रुवारीला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Potato Recipe : नेहमीची बटाट्याची भाजी खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा ढाबा स्टाइल 'हा' पदार्थ

Children's Day 2025 Speech: मुलांना मराठीत लिहून द्या बालदिनानिमित्त भाषण; टाळ्यांच्या कडकडाटा होईल कौतुक

Maharashtra Live News Update: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणात अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! नवले पुलाजवळ भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना उडवलं, ४ जणांचा मृत्यू

Black Dark Lips: ओठांवरचा काळपटपणा कसा दूर कराल? या जादुई टिप्स वाचा

SCROLL FOR NEXT