₹1.20 CRORE CASH EMBEZZLEMENT EXPOSED saam tv
मुंबई/पुणे

विश्वासाने दिले १.२० कोटी, बॅग उघडताच कागदी पुड्या; राजस्थानात आवळल्या आरोपीच्या मुसक्या

Pydhonie Police Recover ₹1.16 Crore In ₹1.20 Crore Cash Embezzlement Case: विश्वासाने सोपवलेल्या १ कोटी २० लाखांच्या रोकड अपहाराचा पायधुनी पोलिसांनी पर्दाफाश केला. राजस्थानातून आरोपीला अटक करत १ कोटी १६ लाख ५० हजारांची रोकड जप्त केली.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

विश्वासाने सोपविण्यात आलेल्या तब्बल १ कोटी २० लाख रुपयांच्या रोकडचा अपहार केल्याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत पोलिसांनी राजस्थानातून एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून १ कोटी १६ लाख ५० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी फिर्यादीने दुसऱ्या कार्यालयातून १ कोटी २० लाख रुपये आणण्याची सूचना आरोपी पीरसिंग देवडा याला केली होती. त्यानुसार रोकड असलेल्या दोन बॅगा फिर्यादीकडे देण्यासाठी आरोपीकडे विश्वासाने सोपविण्यात आल्या होत्या. मात्र, आरोपीने या बॅगा बदलून त्यामध्ये कागदी पुड्या भरल्या आणि प्रत्यक्ष रोकडचा अपहार केला. या घटनेप्रकरणी १० ऑगस्ट २०२६ रोजी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८७२/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१६(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक बाबी, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे प्रथम घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर तपास पथकाने अहमदाबाद येथे जाऊन तपासाची दिशा निश्चित केली.

तपासादरम्यान आरोपीने आपल्या साथीदारासोबत संगनमत करून हा गुन्हा केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर पोलिस पथकाने राजस्थान गाठून १४ ऑगस्ट रोजी आरोपीचा साथीदार युवराज सिंह वसंतसिंग देवडा (वय २४) याला अटक केली. तो राजस्थानातील सिरोही जिल्ह्यातील मामावली येथील रहिवासी असल्याचे नमूद आहे. अटक आरोपीकडून अपहार झालेल्या १ कोटी २० लाख रुपयांपैकी १ कोटी १६ लाख ५० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित रक्कम आणि गुन्ह्यातील इतर बाबींबाबत तपास सुरू आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी पीरसिंग वसंतसिंग देवडा (वय ३०) याचा शोध घेण्यात येत असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पायधुनी पोलिसांनी तपास पथकाने केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT