Mumbai Local Train Accident Saam
मुंबई/पुणे

Local Accident: दोन लोकल एकमेकांना घासल्या, दारावर लटकलेल्या प्रवाशांची पाठ सोलली गेली अन् रूळावर पडले; ६ जणांचा मृत्यू

Mumbai Local Train Accident: दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान, २ लोकल एकमेकांना जोरात घासल्यामुळे मोठा अपघात झाला. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

Bhagyashree Kamble

आज सकाळी मध्य रेल्वे मार्गावर एक भीषण दुर्घटना घडली आहे. दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान, दोन लोकल जवळून गेल्यामुळे लोकलमधील प्रवाली खाली पडले. एक लोकल कसाऱ्याच्या दिशेनं येत होती. तर, दुसरी लोकल सीएसएमटीच्या दिशेनं जात होती. यादरम्यान, दारावर लटकून प्रवास करणारे अंदाजे १२ प्रवासी थेट रूळावर पडले, त्यापैकी ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रेल्वेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रूळावर पडलेले प्रवासी हे लोकलच्या फुटबोर्डवर उभे होते. विरूद्ध दिशेनं येणारी धावती लोकल जवळून गेली. यादरम्यान, प्रवासी एकमेकांना धडकले. प्रवाशांचा तोल गेला आणि ८ प्रवासी खाली पडले. काही रूळावर पडल्याची माहिती आहे. यातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

जखमी रूग्णांना कळवा येथील रूग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

जखमी रूग्णाने दिलेल्या माहितीनुसार, लोकलमधील प्रवासी दारावर लटकलेले उभे होते. धावती २ लोकल विरूद्ध दिशेनं जवळून गेल्यामुळे दारावर उभे असलेले प्रवासी एकमेकांना धडकले. तोल जाऊन काही प्रवासी रेल्वे रूळावर पडले. यात ६ जणांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : हॉस्टेलमध्ये घुसून मुलींवर अत्याचार; आरोपी लोकांच्या तावडीत सापडला, पोलीस ठाण्यात हत्येचा थरार

Dhule Tourism : धुळे जिल्ह्यातील २ सुंदर धबधबे, मिळेल स्वर्गसुखाचा अनुभव

Maharashtra Live News Update : काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये भूमिपूजनावरून वाद

Ladki Bahin Yojana : सरकारच्या तिजोरीवर ताण, लाडकी बहीण योजना बंद होणार? मिसेस मुख्यमंत्री म्हणाल्या...

Kalyan News: शालिमार एक्स्प्रेसमधून ८.५ किलो गांजा जप्त; कल्याणमध्ये GRPF पोलिसांची मोठी कारवाई|VIDEO

SCROLL FOR NEXT