Pradhan Mantri Awas Yojana Google
मुंबई/पुणे

PM Awas Yojana: पुणेकरांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार! पीएम आवास योजनेत आणखी ४००० घरे मिळणार

PM Awas Yojana: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणेकरांना पीएम आवास योजनेत अजून ४००० घरे मिळणार आहेत. परवडणाऱ्या किंमतीत नागरिकांना ही घरे मिळणार आहेत.

Siddhi Hande

मुंबई-पुण्यात स्वतः चे घर असावे, अशी अनेकांची इच्छा असते. मुंबई पुण्यातील घरे खूप महाग आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी म्हाडा दरवर्षी घरांसाठी लॉटरी काढते.याचसोबत पीएम आवास योजनेअंतर्गत घरांसाठी सब्सिडी मिळते. दरम्यान, पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणेकरांना आणखी ४ हजार घरे मिळणार आहेत. (PM Awas Yojana)

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महापालिकेकडून दुसऱ्या टप्प्यात चार हजारांहून अधिक फ्लॅट बांधण्यात येणार आहे. बालेवाडीसह मुंढवा, धानोरी व वडगाव अशा वेगवेगळ्या भागांत या सदनिका बांधण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा घेतला. त्यानंतर त्याला गती देण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला केल्या आहेत.

सर्वांना हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान मंत्री आवास योजना हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत पुणे महापालिकेकडून पहिल्या टप्प्यात २६५८ इतक्या सदनिका बांधण्यात आल्या आहेत. त्यामध्ये हडपसर येथे तीन, खराडी येथे एक आणि वडगाव येथे १ असा चार प्रकल्पांचा समावेश आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना ही घरे देण्यात आली असून आठ ते दहा लाख रुपयांपर्यंत या घरांच्या किंमती आहेत.

म्हाडाची लॉटरी

म्हाडाची घरेदेखील खूप स्वस्त असतात. २९ जानेवारी रोजी म्हाडाच्या घरांची सोडत प्रक्रिया सुरु होणार आहे. गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाच्या पुणे मंडळाने ऑक्टोबर महिन्यात जाहीर केलेल्या घरांची सोडत झाली आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडली. यामध्ये ६,४२० घरांसाठी सोडत करण्यात आली आहे. यासाठी ९३६६२ अर्ज प्राप्त झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT