
दिग्दर्शक शिवाजी दोलताडे आता "सुनबाई लय भारी" हा चित्रपट घेऊन येणार आहेत. महिला सक्षमीकरण या विषयावर बेतलेल्या धमाल मनोरंजन करणाऱ्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाँच करण्यात आलं असून, मार्च महिन्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चित्रपटाचं चित्रीकरण सुरू करण्यात येणार आहे.
सोनाई फिल्म क्रिएशन तर्फे "सुनबाई लय भारी" या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. चित्रपटाच्या पोस्टर लाँच वेळी चित्रपटाचे लेखक, निर्माते गोवर्धन दोलताडे , अभिनेते रोहन पाटील, आमदार तुकाराम बिडकर उपस्थित होते. चित्रपटाचे सहनिर्माते कार्तिक दोलताडे पाटील आहेत. महिला सक्षमीकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. शिक्षण आणि आरोग्यसेवा यासारख्या काही क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली असली तरी, भारतातील महिलांना अजूनही पूर्ण सक्षमीकरणात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
सक्षमीकरण म्हणजे महिलांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली साधने देणे इतकेच नाही; तर त्यामध्ये त्यांना मागे ठेवणाऱ्या सामाजिक संरचनांना आव्हान देणे आणि बदलणे देखील समाविष्ट आहे, महिला सबलीकरणासह महिलांवरील अत्याचार थांबवणे, कमी पाठबळ असून सुदधा कौशल्याच्या जोरावर उत्तुंग भरारी मारणे, सर्वसामान्य महिलांनी उद्योग व्यवसायात भरारी कशी घ्यावी या आशयसूत्रावर "सुनबाई लय भारी" हा चित्रपट बेतला आहे.
"सुनबाई लय भारी" हा चित्रपट समाजातील अनेक महिलांचे प्रश्न सोडवून त्यांना सामाजिक दृष्टीने वरदान ठरणार आहे , चित्रपटात मोठ्या कलाकारांचा समावेश असणार आहे , मात्र सध्या कलाकारांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत .
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.