
जर तुमची पत्नी गृहिणी असेल आणि तुम्ही तिच्यासाठी काही गुंतवणूकीचे पर्याय शोधत असाल तर या ३ योजनांमध्ये आपण गुंतवणूक करू शकता. महिलांसाठी विविध योजना आहेत. पण कोणती योजना फायदेशीर ठरेल? कोणत्या योजनेत पैसे गुंतवणूक केल्यावर व्याजाच्या स्वरूपात उत्तम परतावा मिळेल? असे अनेक प्रश्न साहजिक तुमच्याही मनात आले असतील. जर आपल्याला योजेतून व्याजव्यातिरिक्त इतर फायदे हवे असतील तर, ही ३ योजना आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या योजनांमध्ये कमीत कमी गुंतवणूक करून चांगला नफा मिळू शकेल.
तुम्ही या ३ योजनांमध्ये पैसे गुंतवू शकता
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही कमी कालावधीत सुपरहिट ठरली. या योजनेत महिला किमान १००० रुपये गुंतवू शकतात. या योजनेअंतर्गत दिला जाणारा व्याजदर वार्षिक ७.५ टक्के आहे. जो तिमाही आधारावर दिला जातो. याशिवाय, मॅच्युरिटी पिरियड ही २ वर्षांसाठी आहे. २ वर्षानंतर आपण पैसे काढू शकता.
आरडी योजना
महिलांसाठी आरडी हा देखील एक चांगला पर्याय आहे. यामध्येही तुम्ही १००० रुपये किंवा त्याहूनही कमी रकमेपासून गुंतवणुकीची सुरुवात करू शकता. तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये आरडी अकाऊंट उघडू शकता. यामध्ये व्याजाची रक्कम वेगवेगळ्या कालावधी आणि संस्थांनुसार बदलते. पोस्ट ऑफिस आरडीवर ६.५% व्याज मिळते आणि एसबीआय सुमारे ७% व्याज देत आहे.
म्युच्युअल फंड एसआयपी
एसआयपी देखील गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे. म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. यामध्ये, आरडी आणि महिला सन्मान प्रमाणपत्राच्या तुलनेत जास्त व्याजदराचा लाभ उपलब्ध आहे. या योजनेत, तुम्ही ५०० रुपयांपासून देखील सुरुवात करू शकता. एसआयपीमध्ये गुंतवणूकदारांना ८ टक्के ते १२ टक्के आणि १५ टक्के व्याजाचा फायदा मिळतो. कमी गुंतवणुकीत व्याजाच्या स्वरूपात आपल्याला उत्तम परतावा मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.