PUNE AGRICULTURE COLLEGE CONTROVERSY: DR MAHANAND MANE TRANSFERRED AFTER CHAITANYA CHAVAN CASE Saam tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्यातील कृषी महाविद्यलयातील डॉ. महानंद माने यांची बदली, कुठे झाली नियुक्ती?

Pune Agriculture College : पुणे कृषी महाविद्यालयातील चैतन्य चव्हाण मृत्यू प्रकरण, विद्यार्थी आंदोलन आणि विविध वादांनंतर सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने यांची बदली करण्यात आली. डॉ. भालेकर यांनी अतिरिक्त कार्यभार स्वीकारला.

Alisha Khedekar

  • पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने यांची बदली

  • चैतन्य चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन

  • ‘धनादेश बाउन्स’ आणि आरोग्य केंद्र बंद राहण्याच्या घटनांमुळे प्रशासनावर टीका

  • प्रा. डॉ. भालेकर यांनी अतिरिक्त कार्यभार स्वीकारला असून चौकशी समिती कार्यरत

सागर आव्हाड, पुणे

पुणे येथील कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने यांची अखेर बदली करण्यात आली असून, गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या विविध वादग्रस्त घटनांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने ही कारवाई केल्याची चर्चा विद्यापीठ परिसरात रंगली आहे. दरम्यान, प्रा. डॉ. भालेकर यांनी सहयोगी अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून कृषी महाविद्यालय सतत चर्चेत राहिले होते. चैतन्य चव्हाण मृत्यू प्रकरण, प्रक्षेत्रावरील राडारोडा, आरोग्य केंद्र बंद राहणे तसेच मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला देण्यात आलेला ‘धनादेश बाउन्स’ होण्याच्या घटना चव्हाट्यावर आणल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने ही कारवाई केल्याची चर्चा विद्यापीठ परिसरात आहे. दरम्यान, प्रा. डॉ. भालेकर यांनी सहयोगी अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला.

मिळालेल्या माहितीनुसार, महाविद्यालयाचा विद्यार्थी चैतन्य चव्हाण याचा मेसमध्ये विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याने संपूर्ण महाविद्यालय हादरले होते. या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाविरोधात आंदोलन करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली होती.

चैतन्य चव्हाण प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारने कृषी विद्यापीठांच्या इमारतींचे सुरक्षा आणि तांत्रिक ऑडिट करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा केली होती. या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने अधिष्ठाता डॉ. सताप्पा खरबडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीही स्थापन केली होती. माने यांच्यावर कारवाई करण्यात आली असली तरी त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एका रात्रीत चेहरा चमकून निघेल! महागड्या क्रिम्सऐवजी चेहऱ्याला लावा फक्त ही एक गोष्ट

Face Care: चेहऱ्यावरील काळे डाग आणि खड्डे होतील कायमचे दूर, रात्री झोपताना १० मिनिटांसाठी लावा ही पेस्ट

भूकंपाने जमीन थरथरली, गूढ आवाजाने माणसं घाबरली; घर सोडून रस्त्यावर पळाले

Maharashtra News Live Update: उद्यापासून सर्व बस स्थानकांवर प्रसाधन गृह मोफत- परिवहन मंत्री

रायगड ते रत्नागिरी प्रवास आता जलद; ‘वेश्वी-बागमांडला’ फेरीबोट सेवेची क्रेझ वाढली, कोकण पर्यटनासाठी मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT