Pune crime x
मुंबई/पुणे

Pune : नणंदेच्या जाचाला कंटाळून महिलेची ६ वर्षीय मुलासह आत्महत्या, लिपस्टिकने लिहिली सुसाईड नोट; आत्महत्येचा व्हिडीओ आला समोर

Pune News : पुण्याच्या आंबेगाव बुद्रुक येथे एका महिलेने तिच्या सहा वर्षांच्या चिमुकल्यासह आत्महत्या केली. या महिलेने मुलासह इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन खाली उडी मारली. या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.

Yash Shirke

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात राहणाऱ्या महिलेने पाचव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली होती. महिलेने नणंदेच्या त्रासाला कंटाळून सहा वर्षीय मुलासह इ जाऊन उडी मारली होती. या महिलेने लिपस्टिकने सुसाईड नोट लिहिली होती. पोलिसांनी ही सुसाईड नोट जप्त केली आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ आता समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव मयुरी देशमुख असे आहे. पुण्याच्या आंबेगाव बुद्रुक परिसरातील कल्पक सोसायटीमध्ये काल (१८ जून) संध्याकाळी ६ च्या सुमारास धक्कादायक घटना घडली होती. कल्पक सोसायटीमध्ये राहणाऱ्या देशमुख कुटुंबातील मयुरी देशमुखने तिच्या सहा वर्षांच्या मुलांसह आत्महत्या केली.

मयुरी तिच्या सहा वर्षीय मुलासह इमारतीच्या पाचव्या मजल्यावर गेली. तेथून दोघांनी खाली उडी मारली. खाली पडल्यानंतर दोघांचाही जागीच मृत्यू झाला. आत्महत्या करण्यापूर्वी मयुरीने लिपस्टिकने सुसाईड नोट लिहिली होती. 'नणंदेच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे', अशी सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे.

सासरी नणंदेकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिलेने तिच्या सहा वर्षीय मुलासह इमारतीवरुन खाली उडी मारुन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या धक्कादायक घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. आता या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: वडीलांच्या सल्ल्यामुळे आयुष्य बदललं; १०वी फेल तरुणाने क्रॅक केली UPSC; ईश्वर गुर्जर यांचा प्रवास

Manoj Jarange Patil Protest Live Updates : शिवेंद्रराजे भोसलेंचा मराठा आरक्षणाला पाठिंबा

Manoj Jarange : मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल! मनोज जरांगेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन

Grahan Dosh: 6 सप्टेंबरपासून 'या' राशींच्या अडचणी वाढणार; 18 वर्षांनंतर राहू-चंद्र बनवणार अशुभ ग्रहण योग

Kendra Yog 2025: 3 सप्टेंबरपासून 'या' राशींना मिळणार प्रत्येक कामात यश; बुध-युरेनस बनवणार पॉवरफुल योग, पैसाही येणार

SCROLL FOR NEXT