Shocking Case in Pune AI
मुंबई/पुणे

Pune: लग्नानंतर नवरा नपुंसक असल्याचं कळलं; नववधुला सासऱ्याकडून धमकी, कुणाला सांगितलं तर...

Shocking Case in Pune: पुण्यात तरुणीने लग्नानंतर पती नपुंसक असल्याचे समोर आल्यानंतर तक्रार दाखल केली. सहा जणांविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Bhagyashree Kamble

पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असतानाच आणखी एका घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. लग्नानंतर पती नपुंसक असल्याचं समोर आलं. त्यानंतर सासरच्यांकडून छळ सुरू झाला. याच त्रासाला कंटाळून विवाहितेनं पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. सासरच्या मंडळींना आधीपासूनच मुलगा नपुंसक असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी जाणीवपूर्वक लपवून ठेवल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विवाहितेचे वय २३ आहे. तिचं १८ एप्रिल २०२५ रोजी तरूणाशी विवाह झाला. लग्न झाल्याच्या काही दिवसानंतर पती नपुंसक असल्याची माहिती तरूणीला मिळाली. तिच्या पायाची वाळू सरकली. तिनं याबाबत पती आणि सासरच्या मंडळींना काही प्रश्न विचारले, जाब विचारला. मात्र, तिला बदल्यात धमकी देण्यात आली. 'कुणाला सांगितले तर याचे गंभीर परिणाम होतील', अशी धमकी देण्यात आली, असं तरूणीनं सांगितले.

नंतर सासरच्या मंडळींनी तरूणीचे इतर व्यक्तीसोबत संबंध असल्याचा खोटा आरोप केला. तसेच विवाहित महिलेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, असं विवाहितेनं तक्रारीत नमूद केलं आहे. यासह मानसिक छळ देखील केला जात होता, असं पीडितेनं म्हटलंय. याच त्रासाला कंटाळून तिनं पोलीस ठाण्यात धाव घेण्याचा निर्णय घेतला.

या प्रकरणी विवाहितेनं समर्थ पोलीस ठाण्यात जाऊन पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती, सासरे, सासू, नणंद, नणंदेचा पती आणि चुलत सासऱ्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. समर्थ पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections : पुणे, पिंपरीत भाजपचे 'एकला चलो रे', अजित पवार काय निर्णय घेणार?

Dapoli Travel : नवीन वर्षाची सुरुवात ॲडव्हेंचरने करा, 'दापोली' जवळ आहे साधा-सोपा ट्रेकिंग स्पॉट

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना ७ दिवसात ₹३००० मिळणार; नोव्हेंबर-डिसेंबरच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट

Oats Uttapam Recipe: सकाळी नाश्त्याला फक्त १० मिनिटांत बनवा ओट्स उत्तपम, सोपी आहे रेसिपी

Akshaye Khanna Brother : संजय लीला भन्साळींसोबत काम, वडिलांप्रमाणेच पकडली अध्यात्माची वाट; अक्षय खन्नाचा सावत्र भाऊ आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT