मुंबई/पुणे

Pune News: दैव बलवत्तर! लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रकवर पडली विजेची तार अन्...

Electric Wire Falls on Wedding Truck: भोर तालुक्यातील बाजारवाडी गावात लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रकवर विजेची तार पडली. विद्युत प्रवाह सुरू असल्याने तारांमध्ये घर्षण होऊन रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गवताला आग लागली आहे.

Bharat Jadhav

  • भोरमध्ये मोठा अपघात टळला

  • वऱ्हाडाच्या ट्रकवर विजेची तार पडली

  • कोणतीही जीवितहानी नाही

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

पुण्याच्या भोर तालुक्यातील बाजारवाडी गावात लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रकवर विजेची तार पडल्याची घटना घडली आहे.वऱ्हाडाला घेऊ जाणाऱ्या ट्रकचा धक्का विजेच्या खांब लागला.ट्रकचा धक्का लागल्यानं विजेची तार तुटून थेट ट्रकवर पडली. सुदैवाने ट्रकमधील प्रवासी आणि गावकऱ्यांना शॉक लागला नाही. कुठलीही कुठलीही दुखापत झाली नाही, यामुळं मोठी दुर्घटना टळली.

मात्र या तारांमध्ये विद्युत प्रवाह सुरू असल्याने तारांमध्ये घर्षण होऊन रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गवताने पेट घेतला. वऱ्हाड असलेल्या ट्रकवर विजेची तार पडल्याची माहिती मिळताच गावातील लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ सतर्कता दाखवत विजेच्या तारामुळे गवताला लागलेली आग आटोक्यात आणली.

दरम्यान या घटनेमुळं गावातील वीजपुरवठा काही काळ खंडीत झाला होता. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ वीज प्रवाह बंद केला, त्यानंतर तुटलेली तार ट्रकवरून दूर केली. त्यानंतर त्याची जोडणी करत खंडीत झालेला वीज प्रवाह सुरळीत सुरू केला. दरम्यान लोंबकळणाऱ्या तारा वेळेत दुरुस्त न केल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. महावितरणच्या निष्काळजीपणाबाबत संताप व्यक्त केला जातोय. संबंधित विभागाने या घटनेची दखल घेऊन तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

भरधाव कार ट्रॅव्हल्सवर आदळली, एकाच कुटुंबातील तिघांचा अंत

पुणे-नाशिक महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकहून पुण्याकडे भोसरीच्या दिशेने येत असताना एमएच १४ डीटी १७७० या कारचा अचानक ताबा सुटला. कार समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सवर जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला.

या अपघातात मल्लिकार्जुन शिवराज आंबेगावे, त्यांची पत्नी आरती मल्लिकार्जुन आंबेगावे आणि सासू लता बाळू तुपलोंढे यांचा जागीच मृत्यू झाला. तर १५ आणि १६ वर्षांची मुलगा आणि मुलगी या अपघातातून बचावलेत. मात्र त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर मंचर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Video: सापांना पळवून लावणारी छडी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ

RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT