Parbhani Accident: जिंतूर-चारठाणा रोडवर कार-ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक; भीषण अपघातात कारचा चक्काचूर, चौघांचा जागीच मृत्यू

Parbhani Accident : महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर-चरथाना रस्त्यावर कार आणि ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली. यात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
Parbhani Accident :
Severely damaged car after deadly collision on Jintur-Charthana road in Parbhani.
Published On
Summary
  • जिंतूर-चारठाणा रोडवर भीषण अपघात

  • कार-ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक

  • चौघांचा जागीच मृत्यू

विशाल शिंदे, साम प्रतिनिधी

परभणी जिल्ह्यातील जिंतूर-चारठाणा रोडवर एक भीषण अपघात झाला आहा. कार आणि ट्रॅव्हल्स यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेले सर्वजण वसमत येथील रहिवासी असून ईदच्या निमित्ताने मंठा येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होते.

Parbhani Accident :
'मी अवतारी, तू मागील जन्माची अप्सरा'; लग्नाचं आमिष दाखवत महिलेचं लैंगिक शोषण; अशोक खरातविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल

अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. तर कारमधील प्रवाशांचा चेंदामेंदा झाला आहे. या दुर्घटनेत सय्यद स्माईल (वय 32), सय्यद उपाध सय्यद (वय 7), सय्यद सुमय्या अझर अली (वय 32) आणि अझर महमूद (वय 38) या चौघांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्वजण वसमत येथून मंठा येथे ईद सणासाठी निघाले होते. तर ट्रॅव्हल्स मधील 4 ते 5 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे.

ही घटना 22 मार्च रोजी दुपारनंतर घडली. अपघातग्रस्त कार वसमत येथून मंठ्याकडे निघालेली होती. वसमत येथील सय्यद कुटुंब हे कारने ईदनिमितच्या भेटीसाठी मंठ्याला त्यांच्या नातेवाईकांकडे जात होते. त्यावेळी मार्गावर मंठ्याकडून जिंतूरकडे येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हेलरची आणि कारची समोरा समोर जोरदार धडक बसली.

Parbhani Accident :
नांदेडमध्ये खळबळ; दुचाकीला आग लागल्यानंतर व्यक्तीचा होरपळून मृत्यू

ही कार (MH 12 GF 6259) समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्स (MH 20 DD 7666) ला धडकली. धडक इतकी जबरदस्त होती की कार तब्बल 50 ते 60 फूट दूर फेकली गेली. या धडकेत कारचा पूर्ण चुराडा झाला. या अपघातात कुटुंबातील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com