Accident News : साईबाबांच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच राहिली, भरधाव टेम्पोने साईभक्तांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू

Nashik Accident News : नाशिक महामार्गावर साई भक्तांचा भीषण अपघात झाला असून एकाचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. कसारा बायपासजवळ भरधाव टेम्पोने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.
Accident News : साईबाबांच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच राहिली,  भरधाव टेम्पोने साईभक्तांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू
Nashik Accident NewsSaam Tv
Published On
Summary
  • नाशिक महामार्गावर भीषण अपघात

  • साई भक्त शिर्डीकडे पायी जात होते

  • एकाचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी

  • कसारा बायपासजवळ टेम्पोची जोरदार धडक

फैय्याज शेख, शहापूर

Nashik Expressway Devoters Accident News नाशिक महामार्गावर पायी जाणाऱ्या साई भाक्तांचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. उभ्या असलेल्या वाहनाला मागून येणाऱ्या गाडीने जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई नाशिक महामार्गावरून साई भक्त पायी चालत शिर्डीच्या दिशेने जात होते. रात्री खर्डीहून निघालेल्या साईपलखी ही कसारा बायपास जवळ आली. यादरम्यान कसारा बायपासजवळ साई भक्त महामार्गाने पायी चालत जात असताना, मागून येणाऱ्या भरधाव टेम्पोने उभ्या असलेल्या गाडीला धडक दिल्याने, उभी असलेली गाडी ही मागून साई भक्तांवर धडकली. सदर अपघात रात्री १ च्या सुमारास घडला .

Accident News : साईबाबांच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच राहिली,  भरधाव टेम्पोने साईभक्तांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू
Sangli : नामांकित शिक्षण संस्थेच्या संचालकाची निर्घृण हत्या; अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये मृतदेह सापडला, सांगलीतील धक्कादायक घटना

हा अपघात इतका भीषण होता की, एकाचा मृत्यू झाला. मृत झालेल्या तरुणाचे नाव सोमनाथ अधिकारी असे असून तो मुंबई कांजूर मार्ग येथील राहाणारा होता. तर प्रवीन मोरे, संकेत पवार , प्रवीन इलाड, प्रकाश गीते हे जखमी झाले आहेत. यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com