Maharashtra Heat Wave Yandex
मुंबई/पुणे

Weather: उकाड्याचा कहर, तापमान ४२.५ अंश सेल्सिअसवर, पुणेकरांना आणखी बसणार उन्हाचे चटके

Heatwave Hits Pune City Experiences Sweltering Conditions: मे महिन्यात राज्यभर उन्हाचे चटके सुरू झाले असून, नागरिकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. पुणे शहरात सध्या उकाड्याचा कहर आहे, आणि पुणेकर अक्षरशः घामाघूम झाले आहेत.

Bhagyashree Kamble

मे महिन्याला सुरूवात झाली. राज्यात हळूहळू उन्हाचे चटके बसायला सुरूवात झाली आहे. याचा सर्वाधिक फटका राज्यातील अनेक भागातील लोकांना बसत आहे. विशेष म्हणजे पुणे शहरात सध्या उकाड्याचा कहर असून, पुणेकर अक्षरश: घामाघूम झाले आहेत.

यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमान ४३.६ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. तर, पुण्यातील लोहगावात सर्वाधिक ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्या पुणे शहरात उष्णतेसह दमट हवामान कायम राहणार आहे. काही भागांत तापमानात १ ते १.५ अंशांची घट होण्याची शक्यता असली, तरी एकूणच वातावरण उष्णच राहिल, अशी माहिती समोर आली आहे. लोहगावमध्ये सर्वाधिक ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

वेधशाळेनुसार, तीन दिवसांनी हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. हवामान कोरडे आणि ढगाळ राहिल, तसेच हलक्या सरी पडू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शहरातील इतर महत्त्वाच्या भागांतील तापमान:

शिवाजीनगर आणि पाषाण ३९.७ अंश

मगरपट्टा ३९.२ अंश

कोरेगाव पार्क ३८.६ अंश

हडपसर ३८.२ अंश

वडगावशेरी ३८ अंश

दरम्यान, यंदाच्या मे महिन्यात उष्णतेच्या लाटा प्रत्येक राज्यात अधिक राहण्याची शक्यता आहे. राजस्थान, हरयाणा, पंजाब, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, गुजरात, ओडीशा, छत्तीसगड, तेलगंणा, महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकमध्ये उष्णेतेमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तर, महाराष्ट्रात उत्तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात, १ ते ३ दिवस अधिक उष्ण लाटा अनुभवायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील; वाचा राशीभविष्य

Ganpati Visarjan 2025: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बनतोय दुर्मिळ संयोग; 'या' गोष्टी दान करणं मानलं जातं शुभ

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

SCROLL FOR NEXT