PUNE DAM WATER STORAGE DROPS TO 12.52 PERCENT; WATER CRISIS FEARS GROW AMID WEAK MONSOON Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा; जून संपत आला तरी धरणांतील पाणीसाठा चिंताजनक

Pune Water Crisis Update News : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांतील पाणीसाठा केवळ १२.५२ टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी घट नोंदवली गेली असून कमी पावसामुळे पाणीटंचाईची चिंता वाढली आहे.

Alisha Khedekar

  • पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांतील पाणीसाठा केवळ १२.५२ टक्क्यांवर

  • गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांतील जलसाठ्यात ३५ टक्क्यांहून अधिक घट

  • आगामी काळात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता

राज्यात मान्सून दाखल झाला आणि एकच आनंदच वातावरण निर्माण झालं. मात्र गेल्या ४ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आजपासून पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. मात्र जून महिना संपत आला तरी पुणे जिल्ह्यात अपेक्षित पावसाची जोरदार हजेरी लागलेली नाही. मान्सूनने सुरुवातीला काही भागांत समाधानकारक पाऊस दिला असला, तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे. विशेषतः शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा झपाट्याने घटल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुणे शहराचा मुख्य पाणीपुरवठा खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांवर अवलंबून आहे. मात्र, या चारही धरणांतील सध्याचा एकूण पाणीसाठा केवळ ३.६५ टीएमसी इतका असून तो एकूण क्षमतेच्या अवघ्या १२.५२ टक्के आहे. गेल्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये तब्बल ४८.१७ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे यंदाच्या तुलनेत पाणीसाठ्यात सुमारे ३५ टक्क्यांहून अधिक घट झाल्याचे चित्र आहे. आकडेवारी पाहता खडकवासला धरणात १३.९५ टक्के, पानशेत धरणात १७.४४ टक्के आणि वरसगाव धरणात ११.८३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर टेमघर धरणातील पाणीसाठा शून्यावर पोहोचला आहे. ही परिस्थिती प्रशासनासह नागरिकांसाठीही चिंतेची बाब मानली जात आहे.

हवामान विभागाने पुढील काही दिवसांत काही भागांत पावसाचा अंदाज वर्तवला असला, तरी धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस होणे अत्यंत आवश्यक आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यासच पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होऊ शकते. अन्यथा शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पाणीसाठ्याची सद्यस्थिती लक्षात घेता प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आगामी जुलै महिन्यात मान्सून सक्रिय होऊन धरणांमध्ये मुबलक पाणी जमा होईल, अशी अपेक्षा पुणेकर व्यक्त करत आहेत. सध्या मात्र सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून वरुणराजा कधी कृपादृष्टी करणार याची प्रतीक्षा कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jaipur Wall Collapse: भीषण दुर्घटना! जयपूरमध्ये भिंत कोसळून 3 जणांचा मृत्यू; अनेक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता

Kidney : किडनी निकामी होण्याआधी शरीर देतं हे ५ संकेत, दुर्लक्ष करणं जिवावर बेतेल

HSRP Number Plate : HSRP नंबर प्लेटबाबत महत्त्वाची अपडेट! आजच करा 'हे' काम नाही तर १ जुलैपासून भरावा लागेल दंड

Face Care: मॉइश्चराइज आणि सॉफ्ट चेहरा पाहिजे? मग ही ५ मिनिटात तयार होणारी पेस्ट रोज रात्री नक्की लावा

Maharashtra News Live Update: केतन अग्रवाल हत्याकांडा मधील आरोपीची आज पोलीस कोठडी संपणार

SCROLL FOR NEXT