KHADAKWASLA DAM WATER STORAGE SURGES BY 13 TMC IN 8 DAYS; PUNE GETS MAJOR RELIEF Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुणेकरांना मोठा दिलासा! पाण्याची चिंता मिटली, ८ दिवसांत धरणातील पाणीसाठा वाढला; वाचा ताजी आकडेवारी

Pune Dam Water Storage Update : पुण्यातील खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठ्यात अवघ्या आठ दिवसांत १३ टीएमसीने वाढ झाली असून एकूण साठा १६ टीएमसीवर पोहोचला आहे. मुसळधार पावसामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला असून चारही धरणांतील जलसाठा सातत्याने वाढत आहे.

Alisha Khedekar

  • पुणेकरांना मोठा दिलासा

  • खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा आठ १६ टीएमसीवर

  • गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा अद्याप सुमारे ३ टीएमसीने कमी

  • खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमध्ये सातत्याने पाण्याची आवक सुरू

Pune Water Dam Storage Update News राज्याला गेल्या ८ दिवसात मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसाने मागील २ महिन्यांपासून सुरु असलेल्या पाण्याच्या समस्येने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा दिला आहे. पुण्याच्या खडकवासला धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात गेल्या आठवडाभरात मोठी वाढ झाली असून पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांमध्ये एकूण १६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. धरणक्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे अवघ्या आठ दिवसांत तब्बल १३ टीएमसी पाणीसाठ्याची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला असला, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत साठा अद्याप कमी असल्याचे चित्र आहे.

सध्या खडकवासला धरण (Khadakwasla Dam Storage Update) प्रकल्पातील एकूण पाणीसाठा १६ टीएमसी इतका असून तो एकूण क्षमतेच्या ५४.८९ टक्के आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणक्षेत्रात १९.८१ टीएमसी म्हणजेच ६७.९७ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. यामुळे यंदा अजूनही सुमारे ३ टीएमसी पाणीसाठ्याची तूट असल्याचे दिसून येत आहे.

धोरणानुसार पाणीसाठ्याचा विचार केला असता, खडकवासला धरणात १.९६ टीएमसी, पानशेत धरणात ६.०१ टीएमसी, वरसगाव धरणात ६.७० टीएमसी तर टेमघर धरणात १.३३ टीएमसी पाणी साठले आहे. धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्यास साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.

दरम्यान, धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने घटत असल्याने खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री १०.३० वाजता ६,२९६ क्युसेक वेगाने सुरू असलेला पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला. मात्र, पुढील काळात धरणक्षेत्रातील पावसाचे प्रमाण आणि धरणात होणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्ग पुन्हा सुरू करण्याचा किंवा त्यामध्ये वाढ-कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thick Curd: पावसाळ्यात घरच्या घरी घट्ट दही कसं लावावं?

Maharashtra News Live Update: भूकंपाच्या धक्क्याने नांदेड हादरलं, मध्यरात्री एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

Maval landslide: दरडीनंतर गाव रिकामं करण्याचा निर्णय महागात पडला, दुसरीकडे राहायला गेले अन् घरातलं सर्वकाही गेलं

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT