Pune Water Tanker Price Hike Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुणेकरांचे पाणी महागले! टँकरच्या पाण्यासाठी मोजावे जागणार जास्त पैसे, नागरिकांना फटका

Pune Water Tanker Price Hike: पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात टँकरने पाण्याचा पुरवठा केला जातो. महानगर पालिकेने पाण्याच्या टँकरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे पुणेकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणेकरांचे पाणी महागले आहे. आता पुणेकरांना पिण्याच्या पाण्याच्या टँकरसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. त्यामुळे पुणेकऱ्यांच्या खिशावर ताण आला आहे. पुणे महानगर पालिकेने पाण्याच्या टँकरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना याचा मोठा फटका बसणार आहे. या निर्णयामुळे पुणेकरांमध्ये नाराजी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेने खासगी टँकरचालकांना पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या टँकरच्या दरात पाच टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पाण्यासाठी खासगी टँकरवर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या खिशावर अधिकचा भार पडण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेच्या मर्यादित पाणीपुरवठ्यामुळे पर्वती, वडगाव शेरी, धायरी, रामटेकडी, चतु:शृंगी, पद्मावती आणि पटवर्धन बाग या ठिकाणी मोफत पाण्याचा पुरवठा टँकरद्वारे केला जातो.

पुण्यातील नागरिकांकडून टँकरची मागणी वाढत असताना मे महिन्यात या मागणीत आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. आत्तापर्यंत दहा हजार लिटर पाण्याचा टँकर खासगी टँकरचालकांना ६६६ रुपयांना मिळत होता. या टँकरचा दर आता ६९९ रुपये इतका झाला आहे. त्यामुळे आता टँकरचे पाणी घेणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागणार आहे. वाढती महागाई आणि पाणीपुरवठ्यावर होणारा खर्च लक्षात घेऊन दरवाढ करण्याची गरज असल्याचे स्पष्टीकरण महापालिकेने दिले आहे.

दरम्यान, पुण्यातील धरणाच्या पाणी साठ्यात घट झाली आहे. वाढत्या उन्हामुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत वाढ झाली असून पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील पाणीसाठ्यावर त्याचा परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून १०.९६ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. शहराला पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे जलसंपदा विभागाने पालिकेला काटकसरीने पाणी वापरण्याच आवाहन केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT