Pune Crime Saamtv
मुंबई/पुणे

Wagholi Crime News: पुणे हादरले! भाजी कापण्याच्या चाकूने सपासप वार; प्रेयसीकडून प्रियकराची निर्घृण हत्या

Pune Wagholi Crime: या हल्ल्यात प्रेयसीही गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Wagholi Crime: पुणे शहरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी सध्या समोर येत आहे. पुण्यातील वाघोली भागात प्रेम प्रकरणातून प्रेयसीने प्रियकराचा खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. (Crime News Marathi)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील वाघोली परिसरात एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये संबंधि तरुण आणि प्रियकर तरुणी राहत होते. दोघांमध्येही प्रेम संबंध होते. मात्र आज (२९, मे) पहाटेच्या सुमारास प्रेयसीने घरातील भाजी कापण्याच्या चाकूने प्रियकरावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रियकराला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. (Latest Marathi News)

मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता. यशवंत महेश मुंढे (वय 20, रा. बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर अनुजा महेश पनाळे (रा. अहमदनगर ) असे खून करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. हे दोघीही इंजिनिअरिंगच शिक्षण घेत होते.

या घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच या हल्ल्यात प्रेयसीही गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. तिलाही जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. लोणीकंद पोलिसांनी याप्रकरणी शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवला आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस हत्येच कारण शोधत आहेत. (Pune Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दौंडच्या यवत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस नाईक निखिल रणदिवे आज दुपारपासून बेपत्ता

AhilyaNagar Crime: लग्नासाठी सततचा त्रास,लॉजमध्ये नृत्यांगनाने घेतला गळफास; भाजपच्या माजी नगरसेवकाला ठोकल्या बेड्या

Mumbai Travel : 'ख्रिसमस'चा दिवस होईल खास, जोडीदारासोबत मुंबईतील 'या' ठिकाणी घालवा निवांत वेळ

Tapovan Trees Cutting: मुंडेंचा आत्मदहनाचा इशारा! ही लढाई कुठल्याही धर्माची नाही तर निसर्गाच्या रक्षणाची

Pune Land Scam Case: पुणे पोलिसांकडून शितल तेजवानीच्या घराची झाडाझडती; महत्त्वाचे कागदपत्रे जप्त, कालाचिठ्ठा येणार बाहेर

SCROLL FOR NEXT