PUNE BUSINESSMAN SHOT, GOLD WORTH ₹11 LAKH LOOTED IN WAGHOLI FIRING INCIDENT Saam Tv
मुंबई/पुणे

घरी निघाला होता, टोळक्यानं वाटेत कार अडवली, गोळी झाडली अन्... पुण्यात प्रसिद्ध व्यवसायिकासोबत पुढे जे घडलं ते थरारक

Businessman Shot And Robbed In Wagholi Pune Gold Loot Case: पुण्यातील वाघोली परिसरात व्यवसायिकावर गोळीबार करून २२ तोळे सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांच्यावर उपचार सुरू असून लोणीकंद पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Omkar Sonawane

सचिन जाधव, साम टीव्ही

पुण्यातील वाघोली परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. गावडेवाडी-शिरसवडी रस्त्यावर व्यावसायिकावर गोळीबार करून 22 तोळे सोन्याचे दागिने लुटण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून लोणीकंद पोलीस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष ज्ञानोबा गावडे (वय ५०, रा. गावडेवाडी, शिरसवडी, ता. हवेली) हे काल रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास कारमधून घरी जात होते. यावेळी दोन दुचाकींवर आलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्यांच्या कारला अडवत त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात गावडे यांच्या जबड्याला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गोळीबारानंतर आरोपींनी जखमी अवस्थेत असलेल्या गावडे यांच्या अंगावरील सुमारे २२ तोळे सोन्याचे दागिने, ज्यांची किंमत अंदाजे ११ लाख रुपये आहे, जबरदस्तीने हिसकावून घेतले. मात्र त्यांच्या हातातील सुमारे १० तोळ्यांचे सोन्याचे कडे आरोपींना काढता आले नाहीत. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

या घटनेदरम्यान वापरण्यात आलेल्या दोन दुचाकींपैकी एक दुचाकी चोरीची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे वाघोली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? थोड्याच वेळात सुनावणी होणार

Maharashtra News Live Update: जरांगेंनी शिंदे-फडणवीस यांच्यावर टीका करू नये - विखे पाटील

White Shoes: पांढऱ्या शूजवर सतत डाग पडून खराब झालेत? मग 'या' घरगुती टिप्सने काही मिनिटांत करा स्वच्छ

Horoscope : ‘या’ 3 राशींच्या नशिबात पैसा आणि प्रेमाचा योग; केतू गोचर देणार मोठे संकेत

Plane Accident: टेकऑफ घेताच फाटला विमानाचा टायर, नंतर इंजिनही बिघडले; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT