Pune Accident News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Accident News: पुण्यात नवले पुलाजवळ विचित्र अपघात; सिग्नलवर थांबलेल्या वाहनांना भरधाव ट्रक धडकला, एकाचा मृत्यू

Pune Truck Accident: पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Ruchika Jadhav

अक्षय बादवे

Pune:

पुण्यातील नवले पुलाजवळ सिग्नलला उभ्या असणाऱ्या वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. ट्रकची जोरदार धडक बसल्याने सिग्नलला उभी असलेली वाहने एकमेकांवर आदळलीत. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कात्रज देहू बाह्यमार्गावर कात्रज चौकाकडून येणारा सिमेंटने भरलेला ट्रक भरधाव वेगात होता. नवले पुलाजवळ चौकात पोहचल्यावर ट्रकने सिग्नलला उभ्या असणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनांना जोराची धडक दिली. यामध्ये सलग उभी असलेली ५ वाहने एकमेकांवर आदळली.

या दुर्घटनेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून संदेश बानदा खेडेकर असे तरुणाचे नाव आहे. अपघातग्रस्त वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे रस्त्यावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

पोलिसांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात घेऊन जाण्याची व्यवस्था केली. तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी सिंहगड वाहतूक विभागाचे कर्मचारी अधिकारी हजर असल्याने तात्काळ मदत मिळाली.

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक, एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी...

बुलढाण्यात देखील अपघाताची अशीच एक थरारक घटना समोर आलीये. चिखली तालुक्यातील शिरपूर येथील दोन तरुण दुचाकीने बुलढाणाच्या दिशेने होते. त्यावेळी केळवद जवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या चार चाकी कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात २० वर्षीय तेजसचा जागीच मृत्यू झालाय. तर राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशन संदीप शेळके यांनी घटनास्थळावरून गंभीर जखमी असलेल्या सार्थक सुनील हिवाळे याला तात्काळ रुग्णालयात हलविण्यासाठी मदत केली. त्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. त्याच्यावर सध्या बुलढाणा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : दवाखान्यावर खर्च होणार, मित्रांच्या चुका माफ करणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, जाणून घ्या

Morning Health Tips: रोज सकाळी पोट साफ होत नाही? आहारात करा 'हे' 5 बदल

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

SCROLL FOR NEXT